मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही अभिनेत्री लवकरच बनणार आई, बेबी शॉवरचे फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 19:47 IST2021-11-04T19:47:19+5:302021-11-04T19:47:39+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील ही अभिनेत्री बऱ्याच म्युझिक अल्बममध्ये झळकली आहे.

This actress from Marathi Cineindustry will soon become a mother, baby shower photos are going viral | मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही अभिनेत्री लवकरच बनणार आई, बेबी शॉवरचे फोटो होतायेत व्हायरल

मराठी सिनेइंडस्ट्रीतील ही अभिनेत्री लवकरच बनणार आई, बेबी शॉवरचे फोटो होतायेत व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अंकिता भगत लवकरच आई बनणार आहे. तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अंकिता भगतने विठू माऊली या लोकप्रिय मालिकेत जानकी देवीची भूमिका साकारली होती. अभिनयाशिवाय अंकिता उत्कृष्ट डान्सरदेखील आहे.

जीव फसला ह्यो जाल्यामंदी, आई तुझा डोंगर यासारख्या अनेक व्हिडीओ अल्बम्समधून अंकिता प्रेक्षकांसमोर आली होती. झी युवा वरील युवा डांसिंग क्वीन या रिऍलिटी शोमध्ये टॉप ६ फिनालिस्टमध्ये देखील ती पोहोचली होती. सोशल मीडियावर विनायक माळीच्या शेठ माणूस, माझी बायको या सीरिजमध्ये ती झळकताना दिसली. या सीरिजमध्ये विनायक माळी आणि अंकिताची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकाना देखील खूपच आवडली होती. 


मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अंकिताने गौरव खानकरसोबत गुपचूप साखरपुडा केला होता. तिच्या साखरपुड्याची बातमी प्रसारमाध्यमात पसरली होती. त्यानंतर काही महिन्यांनी तिने मोठ्या थाटात लग्न केले होते. अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

अंकिता गरोदर असताना साई स्वर म्युजिक प्रस्तुत ‘आई तुझा डोंगर’ हे गाणे तिने शूट केले. या गाण्यात तिला नृत्य सादर करायचे होते. पण हवे तसे तिला करता आले नाही. मात्र डॉक्टरांना विचारूनच आणि स्वतःची व होणाऱ्या बाळाची संपूर्ण काळजी घेऊन तिने हे गाणे शूट केले होते. प्रेग्नन्ट असतानाही अंकिता या गाण्यात अतिशय उत्साहितपणे डान्स करताना दिसते. १ नोव्हेंबर रोजी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे आणि या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. तिचा कोळी गीतावरील मी डोलकर हा म्युजिक व्हिडीओ खूपच गाजला होता. शिवाय गणपती अधिपती, व्हाट्स ऍप गर्ल हे म्युजिक व्हिडिओमध्ये ती झळकली आहे. 

Web Title: This actress from Marathi Cineindustry will soon become a mother, baby shower photos are going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.