अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि तिची गाजलेली अफेअर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 17:23 IST2018-06-15T17:22:26+5:302018-06-15T17:23:02+5:30

इतकेच नाहीतर याच व्यक्तीने तिला मुंबईतील 3 बीएचके आलिशान फ्लॅट गिफ्ट दिल्याचेही बोलले जाते. याआधीही जॅकलिनचे अफेअर्स चर्चेत होते. चला जाणून घेऊ तिच्या आधीच्या अफेअर्सबाबत....

Actress Jacqueline Fernandes and her Affairs! | अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि तिची गाजलेली अफेअर्स!

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि तिची गाजलेली अफेअर्स!

मुंबई : नुकत्याच रिलीज झालेल्या 'रेस 3' मध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सलमान खानची गर्लफ्रेन्ड दाखवण्यात आली आहे. पण रिअल लाइफबाबत सांगायचं तर जॅकलिन सध्या मुंबईतील एका फिटनेस एक्सपर्टला डेट करत आहे. या व्यक्तीसोबत तिला अनेकदा बघितलं गेलं आहे. इतकेच नाहीतर याच व्यक्तीने तिला मुंबईतील 3 बीएचके आलिशान फ्लॅट गिफ्ट दिल्याचेही बोलले जाते. याआधीही जॅकलिनचे अफेअर्स चर्चेत होते. चला जाणून घेऊ तिच्या आधीच्या अफेअर्सबाबत....

अरबच्या प्रिन्सला करत होती डेट

मिस युनिव्हर्स श्रीलंका राहिलेली जॅकलिन सिनेमात येण्याआधी टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करत होती. तिने सिडनी युनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशनच शिक्षण घेतलं होतं. फार कमी लोकांना माहीत आहे की, जॅकलिनचा पहिला बॉयफ्रेन्ड एक प्रिन्स होता. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात ती अरबमधील बहरीनचा प्रिन्स हसन बिन राशिद अली खलीफा याला डेट करत होती. या दोघांची भेट एका कॉमन फ्रेन्डच्या पार्टीमध्ये झाली होती. पुढे जॅकलिनला 'हाऊसफुल' सिनेमा मिळाल्यावर दोघे वेगळे झाले. खलीफा हा बहरीनच्या रॉयल फॅमिलीला सदस्य आहे. त्याने 'Jackie' नावाचा एक व्हिडीओ अल्बम रिलीज केला असून हा व्हिडीओ जॅकलिनवर आधारित होता. 

15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकाला करत होती डेट

32 वर्षीय जॅकलिनच्या पहिल्या ब्रेकअपचं कारण दिग्दर्शक साजिद खान याच्याशी वाढलेली जवळीक मानल जातं. खलीफानंतर जॅकलिनचं अफेअर 15 वर्षांनी मोठ्या साजिद खानसोबत होतं. 2009 मध्ये दोघांच्या अफेअरच्या होऊ लागल्या होत्या. 

जॅकलिनला बॉलिवूडमध्ये मोठी अभिनेत्री व्हायचं होतं अशात साजिदने तिला यासाठी मदत केली. त्यामुळे जॅकलिनला 'हाऊसफुल 1' आणि 'हाऊसफुल 2' सिनेमात ब्रेक मिळाला होता. 2012 मध्ये तर त्यांचं नातं लग्नापर्यत पोहोचलं होतं. इतकं की हाऊसफुलच्या सेटवर जॅकलिनला वहिनी म्हणून हाक मारायचे. पण पुढे जॅकलिनला साजिदच्या पझेसिव्हनेसमुळे त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तिने त्याच्यापासून दूर राहणे पसंत केले. 

सिद्धार्थसोबतही जोडलं गेलं नाव

जॅकलिनचं नाव सिद्धार्थ मल्होत्रासोबतही जोडलं गेलं होतं. दोघांनी 'ए जंटलमन' सिनेमात एकत्र काम केलं होतं. याचवेळी दोघांमध्ये जवळीक वाढली होती, असे बोलले जाते. इतकेच काय तर आलिया आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपचं कारणही जॅकलिनला मानलं जातं. पण दोघांना कधीही यावर जाहीरपणे भाष्य केलं नाही. 

रणबीर कपूरही लागला होता मागे

रणबीर कपूर हा जॅकलिनच्या मागे लागला होता पण जॅकलिनने त्याला जराही भाव न दिल्याचे बोलले जाते. 2014 मध्ये आलेल्या 'रॉय' या सिनेमात रणबीर आणि जॅकलिनने एकत्र काम केले होते. त्यावेळी तो कतरिनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. 2016 मध्ये कतरिनासोबत ब्रेकअप झाल्यावर अशी चर्चा झाली की, तो जॅकलिनला अॅप्रोच करत आहे. रणबीरने तिला अनेक मेसेज करुन डिनरसाठीही विचारल्याचं बोललं जातं.
 

Web Title: Actress Jacqueline Fernandes and her Affairs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.