अभिनेत्री अलका कुबल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:34 AM2024-05-20T11:34:32+5:302024-05-20T11:35:45+5:30

अलका कुबल यांनी त्यांचं राजकारणाविषयी मत व्यक्त केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

Actress Alka Kubal praised Prime Minister Narendra Modi | अभिनेत्री अलका कुबल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, म्हणाल्या...

अभिनेत्री अलका कुबल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, म्हणाल्या...

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये देशाच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा पंतप्रधान होणार की देशात सत्तापालट होणार, हे येत्या 4 जून रोजी स्पष्ट होईल. राजकारणात कलाकार मंडळी देखील त्यांचा सहभाग दर्शवत आहेत. तसेच काही कलाकार हे त्यांचं मतही व्यक्त करत आहे. अभिनेत्री अलका कुबल यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेऊन सध्याच्या राजकीय वातावरणाविषयी त्याच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या.

लोकमत फिल्मीच्या 'नो फिल्टर' सेगमेंटमध्ये अलका कुबल यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांना 'असा कोणता नेता आहे, ज्याची भाषण आणि कामे तुम्हाला आवडतात, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अलका कुबल म्हणाल्या, 'मग मी मोदी यांचं नाव घेईल. फार फॅन आहे मी त्यांची. त्याचा उत्साह, त्यांची उर्जा आणि महाराष्ट्रात तर आमचे तिन्ही नेते म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचं काम पाहून बरं वाटतं'. तसेच 'आता तर मी सगळं उघड केलं', असेही त्या हसत म्हणाल्या. 

अलका कुबल यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. अलका यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. कलर्स मराठीवरील विनोदी शो 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' मध्ये अलका कुबल या सेलिब्रिटी पाहुणे म्हणून पाहायला मिळत आहेत.  'माहेरची साडी' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अलका कुबल यांचा आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही त्या सक्रीय असतात. विविध पोस्टद्वारे त्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.

Web Title: Actress Alka Kubal praised Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.