अबब ! अंगावरचा टॉवेल निसटल्यानं क्लो फेरीची भररस्त्यात झाली पंचाईत
By Admin | Updated: March 22, 2017 14:55 IST2017-03-22T14:55:51+5:302017-03-22T14:55:51+5:30
ब्रिटिश रिअॅलिटी टीव्ही स्टार क्लो फेरी हिच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे.

अबब ! अंगावरचा टॉवेल निसटल्यानं क्लो फेरीची भररस्त्यात झाली पंचाईत
ऑनलाइन लोकमत
इंग्लंड, दि. 22 - ब्रिटिश रिअॅलिटी टीव्ही स्टार क्लो फेरी हिच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे लोकांनी भररस्त्यात तिला नको त्या अवस्थेत पाहिलं आहे. क्लो आंघोळ केल्यानंतर पांढ-या शुभ्र एक टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेतच गाडीतून काही साहित्य आणण्यासाठी गेली असता अचानक तिच्या अंगावरील टॉवेल सुटला. त्यामुळे ती पुरती गोंधळून गेली, अशातच तिने सर्व बॉक्स बाजूला फेकून पहिला स्वतःचा टॉवेल सांभाळला आणि मग ते साहित्य पुन्हा गोळा करू लागली. मात्र याच वेळी कोणीतरी तिचे फोटोज काढले आणि ते व्हायरल केले. त्यामुळे क्लो फेरी सध्या चर्चेत आली आहे.
22 वर्षीय क्लोवर हा प्रसंग ओढावला आहे. क्लोला स्नान केल्यानंतर गाडीत काही साहित्य राहिले आहे याची आठवण झाली. तिने ताबडतोब टॉवेल गुंडाळला असतानाच कारमध्ये ठेवलेल्या एका कार्डबोर्ड बॉक्समधील काही साहित्य बाहेर काढले. मात्र क्लो बॉक्स उचलत असतानाच तिच्या हातातून निसटला आणि त्याच वेळी अंगावरचा टॉवेलही खाली सरकला. क्लोनं प्रसंगावधान दाखवत आजूबाजूला बघून बॉक्स तिकडेच टाकत स्वतःच्या अंगावरून टॉवेल सावरला. मात्र कोणीतरी हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात टिपला. कॅमे-यात चित्रीकरण होत असल्याचं लक्षात येताच ती धावत घरात आली. क्लो ब्रिटिश टीव्ही रिअॅलिटी स्टार आहे. तिचे खरे नाव क्लो एथरिंग्टन आहे.
न्यूकॅसल येथील रहिवासी असलेल्या क्लोला एमटीव्ही रिअॅलिटी सिरीजच्या जिओडी शोर-10साठी ओळखले जाते. त्याचबरोबर क्लो फेरी बिग ब्रदर या सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या 19व्या भागाची स्पर्धक राहिली आहे. ती या शोमध्ये 13 जानेवारी 2017 मध्ये एंटर झाली होती. पुढे एकाच हप्त्यात ती शोच्या बाहेर पडली. क्लो फेरी सन, सेक्स अॅण्ड सस्पीशियस पॅरेंट्स या शोव्यतिरिक्त सेक्स पॉड आणि रिलीज द हाउंड्स या टीव्ही शोसाठीही ओळखली जाते. त्याचबरोबर ती आतापर्यंत बऱ्याचशा रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे. आतापर्यंत केरी तिच्या वजनामुळे चर्चेत असायची. नुकतेच तिने तिचे वजन कमी केल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र तिच्या या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसते आहे.