अभिषेकने उडवली सलमानची खिल्ली, अॅशला आवरेना हसू
By Admin | Updated: January 11, 2017 12:04 IST2017-01-11T11:45:24+5:302017-01-11T12:04:36+5:30
नुकत्याच झालेल्या एका अवाॅर्ड शोमध्ये अभिषेक बच्चन याने सलमानखानची उपरोधिक चेष्टा केली व ती पाहून ऐश्वर्याला हसू आवरेना.

अभिषेकने उडवली सलमानची खिल्ली, अॅशला आवरेना हसू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - सलमान-ऐश्वर्या बॉलिवूडचे एकेकाळचे लव्ह बर्ड्स काही कारणामुळे विभक्त झाले ते कायमचेच. त्यानंतरही त्यांच्याबाबतच्या घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे प्रेक्षकांचे लक्ष असते. ते दोघे कधीही एकत्र येणार असतील तर त्यांच्या अफेअर, ब्रेकअपच्या चर्चेला उधान येतं. अॅश-सलमान दोघे समोरासमोर आल्यावर कायकाय झाले याची चर्चाही अनेक दिवस मिडीया आणि त्यांच्या चाहत्यामध्ये होतं राहते.
(सलमान खानविरोधात ऐश्वर्या रायची याचिका)
नुकत्याच झालेल्या एका अवाॅर्ड शोमध्ये अभिषेक बच्चन याने सलमानखानची उपरोधिक चेष्टा केली व ती पाहून ऐश्वर्याला हसू आवरेना. बराच काळ ती खळखळून हसताना दिसली.
(ऐकलंत का...ऐश्वर्या सलमान खानसोबत काम करण्यास तयार)
अवाॅर्ड शोचे सूत्रसंचालन रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन करत होते, त्यावेळी नोटाबंदीवर हास्य़ात्मक चर्चा सुरु होती. त्यावेळी अभिषेकने एटीएमच्या रांगेत बॉलिवूडचे कलाकार उभे राहिले तर काय घडेल या विषयावर बोलण्यास सुरवात केली. त्यावेळी अभिषेकने सलमान रांगेत आला तर मुझ पर एक एहसान करो की कोई एहसान मत करना असा डायलॉग फेकला. त्याच्या या जोकवर ऐश्वर्याला हसू आवरेना. अभिषेकने त्यानंतर अमिताभ बच्चन यांचा हम जहाँ खडे रहते है, लाईन वहाँ से शुरू होती है हा डायलॉगही वापरला आणि प्रेक्षकांमध्ये एकचं हास्यकल्लोळ झाला.