'नको रे नको लाचार होऊ'; 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये अभिजीत बिचुकलेंना पाहून अवधूत गुप्ते ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 12:52 PM2023-09-06T12:52:30+5:302023-09-06T12:54:00+5:30

Abhijeet bichukle: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या येत्या भागात अभिजीत बिचुकले हजेरी लावणार आहे.

abhijeet-bichukle-in-khupte-tithe-gupte-zee-marathi-show-fans-trolled-avdhoot-gupte-for-his-participation | 'नको रे नको लाचार होऊ'; 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये अभिजीत बिचुकलेंना पाहून अवधूत गुप्ते ट्रोल

'नको रे नको लाचार होऊ'; 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये अभिजीत बिचुकलेंना पाहून अवधूत गुप्ते ट्रोल

googlenewsNext

अवधूत गुप्तेचा 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम सध्या छोट्या पडद्यावर चांगलाच गाजत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकार, राजकारणींनी हजेरी लावली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे अनेक एपिसोड गाजले. यामध्येच आता या कार्यक्रमाच्या येत्या भागात अभिजीत बिचुकले हजेरी लावणार आहे. नुकताच या नव्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. परंतु, हा प्रोमो पाहिल्यावर अनेकांनी अवधूत गुप्तेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

झी मराठीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर खुपते तिथे गुप्तेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अभिजीत बिचुकले सहभागी होणार असल्याचं दिसून येत आहे. अभिजीत बिचुकले कायम त्यांच्या वायफळ बडबडीमुळे चर्चेत येत असतात. त्यामुळे या कार्यक्रमात आता त्यांना पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

'काय गुप्ते एवढी पातळी घसरली की या वेड्याला चॅनेलने बोलावलं?' असा एका युजरने म्हटलं आहे. तर, 'अवधूत दादा, इतके पण वाईट दिवस यावेत तुझ्यावर. अर्र... फडणवीस, राणे, समीर वानखेडे, आता बिचुकले? इतकी अधोगती? आधीच्या पर्वांमध्ये दाभोळकरांसारखे आसामी तुझ्या कार्यक्रमात पाहिलेत, नको रे नको लाचार होऊ ह्या कस्पटासमोर,' असंही एकाने म्हटलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून झाली होती. त्यानंतर या कार्यक्रमात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, डॉ. अमोल कोल्हे, नारायण राणे, श्रेयस तळपदे, वंदना गुप्ते, अमृता खानविलकर, उर्मिला मातोंडकर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
 

Web Title: abhijeet-bichukle-in-khupte-tithe-gupte-zee-marathi-show-fans-trolled-avdhoot-gupte-for-his-participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.