हृतिक, सलमानच्या मॅचमध्ये आमिरच्या मुलाची बाजी
By Admin | Updated: August 27, 2014 01:57 IST2014-08-27T01:57:46+5:302014-08-27T01:57:46+5:30
कुलाबा, मुंबई येथील आॅपरेज या मैदानावर आमिर खानची मुलगी इरा हिने फुटबॉलच्या मॅचचे आयोजन केले होते.

हृतिक, सलमानच्या मॅचमध्ये आमिरच्या मुलाची बाजी
कुलाबा, मुंबई येथील आॅपरेज या मैदानावर आमिर खानची मुलगी इरा हिने फुटबॉलच्या मॅचचे आयोजन केले होते. भटक्या जनावरांसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी निधी उभा करता यावा म्हणून हे आयोजन होते. या मॅचसाठी हृतिक रोशन, सलमान खान, आदित्य रॉय कपूर, सोहेल खान, अभिषेक बच्चन, टायगर श्रॉफ व कुणाल कपूर, अशी सारी स्टारकास्ट हजर झाली होती. साऱ्यांनी फुटबॉलचा आनंद लुटला. आमिर खानचा मुलगा आझाद याने फुटबॉलला ताकदवान किक मारत उपस्थितांचे मनोरंजन केले. साऱ्या कलाकारांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.