जॅकी चॅनसोबत काम करण्यास आमिरचा नकार
By Admin | Updated: May 21, 2015 14:29 IST2015-05-21T14:29:49+5:302015-05-21T14:29:50+5:30
लोकप्रिय अॅक्शन हिरो जॅकी चॅनसोबत काम करण्यास मि. परफेक्शनिस्ट आमिर खानने नकार दिल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

जॅकी चॅनसोबत काम करण्यास आमिरचा नकार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - लोकप्रिय अॅक्शन हिरो जॅकी चॅनसोबत काम करण्यास मि. परफेक्शनिस्ट आमिर खानने नकार दिला असून या बातमीमुळे त्या दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चीन व भारताच्या संयुक्त निर्मितीतून साकारल्या जाणा-या 'कुंग फू योगा' या चित्रपटात आमिर व जॅकी ही जोडी प्रमुख भूमिकेत दिसेल अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. या दोन्ही सुपरस्टार्सना एकत्र पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक होते. मात्र आता आमिरनेच जॅकीसोबत काम करण्यास नकार दिला आहे. पण या निर्णयामागचे नेमके कारण काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तर आमिरच्या नकाराचे कारण आहे त्याचा बहुचर्चित चित्रपट 'दंगल'...
जॅकी चॅनचे बहुसंख्य चित्रपट दिग्दर्शित करणारा स्टॅनली टाँग 'कुंग फू योगा'चे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान होणार आहे, मात्र त्याचवेळी आमिर 'दंगल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल. या दोन्ही चित्रपटांच्या तारखा एकमेकांशी क्लॅश होत असल्याने आपण हा चित्रपट करू शकत नाही असे आमिरने एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले. आमिरच्या या नकारामुळे त्याच्या व जॅकीच्या चाहत्यांची मात्र खूप निराशा झाली असेल हे नक्की..
'कुंग फू योगा' या चित्रपटात चिनी मार्शल आर्ट्स व भारतीय संस्कृतीचा मिलाप बघायला मिळणार आहे.