आमीर खानची चीनमध्ये कमाईची ‘दंगल’
By Admin | Updated: May 22, 2017 21:54 IST2017-05-22T21:54:34+5:302017-05-22T21:54:34+5:30
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या "दंगल" चित्रपटाने चीनमध्ये अक्षरक्ष: कमाईची "दंगल" केली आहे. या चित्रपटाने चीनमध्ये केवळ तीन आठवड्यात तब्बल 725 कोटींची कमाई केली आहे.

आमीर खानची चीनमध्ये कमाईची ‘दंगल’
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या "दंगल" चित्रपटाने चीनमध्ये अक्षरक्ष: कमाईची "दंगल" केली आहे. या चित्रपटाने चीनमध्ये केवळ तीन आठवड्यात तब्बल 725 कोटींची कमाई केली आहे. दंगलने केलेली ही कमाई चिनी बॉक्स ऑफिसवरची आतापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची कमाई आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांत चीनच्या बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.
भारतीय बॉक्स ऑफिसपेक्षा चीनच्या बॉक्स ऑफिवर "दंगल" ने जास्त कमाई केली आहे. "दंगल"ने भारतात 378 कोटी रुपये कमावले. आकड्यांचा हिशेब करायचा झाल्यास "दंगल" ने जगभरात एकूण 1500 कोटींचा टप्पा पार केला आहे. चिनी भाषेत डबिंग करुन नऊ हजार स्क्रिनमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. चीनमध्ये हा चित्रपट 5 मे 2017 रोजी दंगल शुआई जिआओ बाबा (बाबा, चला कुस्ती खेळू) या नावाने चीनमध्ये प्रदर्शित झाला. अवघ्या चार दिवसांत चीनच्या बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.तर आठ दिवसांत या चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवला होता. याआधी चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आमीरचाच होता. आमीर खान आणि अनुष्का शर्माच्या "पीके" चित्रपटाने 140 कोटी मिळवले होते.
दुसरीकडे, दिग्दर्शक एस.एस राजमौली यांच्या "बाहुबली 2" अर्थात "बाहुबली : द कन्क्ल्युजन" या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नव्या विक्रमांची नोंद केली आहे. जगभरातील कमाईने 25 दिवसांमध्ये 1600 कोटींचा आकडा गाठला आहे.