आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:32 IST2025-07-29T16:32:26+5:302025-07-29T16:32:48+5:30

Aamir Khan : आमिर खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. आमिर खानने त्याच्या नव्या सिनेमाला थेट थिएटर रिलीजनंतर लगेच यूट्यूब मूव्हीज-ऑन-डिमांडवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aamir Khan took a big decision, the actor started 'Janata Ka Theater' | आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'

आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) चर्चेत 'सितारे जमीन पर' (Sitare Zameen Par) चित्रपटामुळे चर्चेत आला होता. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. आमिर खानने त्याच्या नव्या सिनेमाला थेट थिएटर रिलीजनंतर लगेच यूट्यूब मूव्हीज-ऑन-डिमांडवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हा सिनेमा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील लोकांपर्यंत सहज आणि स्वस्त दरात पोहोचू शकेल. हा निर्णय सिनेमा प्रदर्शनाच्या पारंपरिक पद्धतीला नवी दिशा देणारा ठरतो. ‘सितारे जमीन पर’ ही फिल्म फक्त युट्यूबवर आमिर खान टॉकिज जनता का थिएटरवर पाहायला मिळणार असून, कोणत्याही इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ती रिलीज केली जाणार नाही.

आमिर खानने नुकतेच पत्रकार परिषदेत जाहीर केलं की त्यांचा हिट सिनेमा ‘सितारे जमीन पर’ १ ऑगस्ट २०२५ पासून जगभरात यूट्यूबवर उपलब्ध होणार आहे. २०२५ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला गेलेला हा चित्रपट आता थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. ही भावनिक आणि कौटुंबिक कथा असलेली फिल्म आहे, ज्यात आमिर खान, जिनिलिया देशमुख यांच्यासोबत १० गतिमंद दिव्यांग कलाकारांचाही समावेश आहे. भारतात ही फिल्म फक्त ₹१०० मध्ये रेंटवर पाहता येईल, तर अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि स्पेनसह ३८ देशांमध्ये ही लोकल प्राइसिंगसह उपलब्ध असेल.

''हे एक मोठं व्यासपीठ असेल''
या लाँचवेळी बोलताना अभिनेता-निर्माता आमिर खान म्हणाला, गेल्या १५ वर्षांपासून मी याचा विचार करत होतो की अशा लोकांपर्यंत कसा पोहोचता येईल जे थिएटरमध्ये जाऊ शकत नाहीत. आज अखेर तो क्षण आला आहे जेव्हा सर्व गोष्टी योग्य पद्धतीने एकत्र आल्या आहेत. सरकारने युपीआय सुरू केलं आणि भारत आता इलेक्ट्रॉनिक पेमेंट्समध्ये जगात क्रमांक १ वर आहे. भारतातील इंटरनेटची पोहोचही झपाट्याने वाढली आहे. आणि यूट्यूब आता जवळजवळ प्रत्येक डिव्हाइसवर आहे. आता आपण भारतातील अनेक भागांपर्यंत आणि जगभरातील लोकांपर्यंत फिल्म पोहोचवू शकतो. माझं स्वप्न आहे की सिनेमा प्रत्येकापर्यंत पोहोचावा योग्य दरात आणि सुलभ पद्धतीने. हा प्रयोग यशस्वी झाला, तर विविध प्रकारच्या कथा सांगणं क्रिएटिव्ह लोकांसाठी शक्य होईल आणि हे नवोदित कलाकार व नव्या फिल्म मेकर्ससाठी एक मोठं व्यासपीठ असेल.

'आमिर खान टॉकिज जनता का थिएटर'वर काय बघायला मिळणार?

आमिर खान टॉकिज जनता का थिएटरवर आमिर खान प्रॉडक्शन्सचे सगळे चित्रपट पाहू शकता येणार आहेत. १ ऑगस्टला सितारे जमीन पर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येईल. त्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यात इतर चित्रपट दाखल होतील. माझ्या वडिलांचे सिनेमेही यात असतील. अभिनेत्याचे काही शोज सत्यमेव जयते सारखे हे मोफत बघता येतील. तरुण दिग्दर्शक-निर्मात्यांना व्यासपीठ मिळत नाही त्यांचे सिनेमे निवडून आम्ही आमिर खान टॉकिजवर टाकू, असे यावेळी आमिरने सांगितले.
 

Web Title: Aamir Khan took a big decision, the actor started 'Janata Ka Theater'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.