पुरस्कार घ्यायला का जात नाहीस? अखेर आमिर खाननेच केला खुलासा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:56 PM2024-04-24T12:56:16+5:302024-04-24T12:57:03+5:30

आमिर खान द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये सहभागी होणार आहे. यावेळी पुरस्कार घ्यायला का जात नाही? याविषयी आमिर खाननेच महत्वाचा उलगडा केलाय (the great indian kapil show, aamir khan)

aamir khan finally disclosed why he not attend award function at the great indian kapil show | पुरस्कार घ्यायला का जात नाहीस? अखेर आमिर खाननेच केला खुलासा, म्हणाला...

पुरस्कार घ्यायला का जात नाहीस? अखेर आमिर खाननेच केला खुलासा, म्हणाला...

मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे आमिर खान.आमिर खान सहसा कोणत्याही रिअॅलिटी शो मध्ये सहभागी होत नाही. पण पहिल्यांदाच एक गोष्ट घडली ती म्हणजे, आमिर खान 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये सहभागी झाला. आजवर कपिल शर्मा शो मध्ये शाहरुख खानपासून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. आता पहिल्यांदाच 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये आमिर खान सहभागी झाला. या शोमध्ये आमिरने पुरस्कार सोहळ्यांना का जात नाही, यावर मौन सोडलं.

आमिर खानला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये अर्चना पूरन सिंग विचारतात की, तू पुरस्कार सोहळ्यांना का जात नाहीस? याशिवाय तू तुला मिळालेला पुरस्कार घ्यायलाही जात नाहीस! यावर आमिरने गमतीत एक महत्वाचं उत्तर दिलंय. आमिर म्हणाला, "तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. त्याचा योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे." आमिरच्या या उत्तराने एकच हशा पिकला.

आमिरने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये विविध गोष्टींवर मौन सोडलंय. कायम धीरगंभीर असणाऱ्या आमिरचा एकदम मजेशीर अंदाज 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये पाहायला मिळाला. या शोमध्ये कॉमेडीयन सुनील ग्रोव्हरनेही आमिर खान आणि सर्वांना खळखळून हसवलं. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा हा नवीन भाग तुम्हाला या शनिवारी २७ एप्रिलला नेटफ्लिक्सवर बघायला मिळेल.

Web Title: aamir khan finally disclosed why he not attend award function at the great indian kapil show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.