रात्रभर झोपला नाही आमिर
By Admin | Updated: November 20, 2014 00:44 IST2014-11-20T00:43:37+5:302014-11-20T00:44:49+5:30
अर्पिता खानच्या संगीत समारंभात शाहरुख खान आणि सलमान खान यांना एकत्र पाहून अनेक चाहत्यांना आनंद झाला.

रात्रभर झोपला नाही आमिर
अर्पिता खानच्या संगीत समारंभात शाहरुख खान आणि सलमान खान यांना एकत्र पाहून अनेक चाहत्यांना आनंद झाला. अर्पितासोबतचा दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला; पण या फोटोमध्ये आणखी एक खान मिसिंग होता, असे अनेकांना वाटले. तो खान म्हणजेच आमिर खान. आमिरला जेव्हा सलमान आणि शाहरुखच्या पॅचअपबाबत विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, हो मला त्यांच्या पॅचअपबाबत माहीत झाले. एवढेच नाही, तर त्यांनी मला रात्रभर झोपू दिले नाही. रात्री दीड वाजता त्यांनी आधी मला फोन केला आणि याबाबत सांगितले. त्यानंतर अडीच वाजता आम्ही फेस टाईम कॉल केला. बोलता-बोलता सकाळ झाली. या दोघांनी मला रात्रभर जागे ठेवले.