आमिरने एकाच दिवशी खाल्ले 100 पान

By Admin | Updated: October 25, 2014 23:42 IST2014-10-25T23:42:14+5:302014-10-25T23:42:14+5:30

आमिर खान ‘पीके’ या लवकरच रिलीज होणा:या चित्रपटात नऊ वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Aamir ate 100 pages a day | आमिरने एकाच दिवशी खाल्ले 100 पान

आमिरने एकाच दिवशी खाल्ले 100 पान

आमिर खान ‘पीके’ या लवकरच रिलीज होणा:या चित्रपटात नऊ वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिरला दररोज विडय़ाची पाने खावी लागत असत. आमिरनुसार या भूमिकेसाठी त्याला एका दिवसात शंभर पानेही खावी लागली आहेत. आमिर म्हणाला की, ‘मला पान खाण्याची सवय नाही. मी कधी कधी पान खात असतो; पण चित्रपटासाठी मला प्रत्येक सीनसाठी पान खावे लागले आहेत. आमच्या सेटवर एका पानवाल्याची सोय करण्यात आली होती.’ राजकुमार हिराणींचे दिग्दर्शन असलेल्या पीके या चित्रपटात आमिरसह अनुष्का शर्मा, संजय दत्त आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 19 डिसेंबरला रिलीज होत आहे. 

 

Web Title: Aamir ate 100 pages a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.