'आई कुठे काय करते' मधील आशुतोष दिसणार नव्या भूमिकेत! मालिका, सिनेमा नाही तर या नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 04:00 PM2024-04-23T16:00:57+5:302024-04-23T16:03:07+5:30

'आई कुठे काय करते' मधील आशुतोष केळकर नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घ्या

Aai kuthe kay Karte fame ashutosh omkar govardhan will be seen in vastraharan natak | 'आई कुठे काय करते' मधील आशुतोष दिसणार नव्या भूमिकेत! मालिका, सिनेमा नाही तर या नाटकात

'आई कुठे काय करते' मधील आशुतोष दिसणार नव्या भूमिकेत! मालिका, सिनेमा नाही तर या नाटकात

'आई कुठे काय करते' या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. 'आई कुठे काय करते'मधील सर्वांची अशीच एक लाडकी व्यक्तिरेखा म्हणजे आशुतोष. अरुंधतीचा दुसरा नवरा अर्थात आशुतोष केळकरची भूमिका साकारली अभिनेता ओंकार गोवर्धधनने. ओंकारला या मालिकेमुळे खुप प्रेम मिळालं. आता ओमकारच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. ओंकार आगामी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

तुम्हाला वाटलं असेल की, ओंकार आगामी मालिका, सिनेमांमधून आपल्या भेटीला येणार तर थांबा. असं काही नाही. ओंकार आगामी नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि विशेश म्हणजे हे नाटक कॉमेडी असणार आहे. ओंकार 'वस्त्रहरण' नाटकात झळकणार आहे.  "भद्रकाली"ची अजरामर नाट्यकृती "वस्त्रहरण" नाटक पुन्हा नव्या कलाकारांच्या संचात रंगभूमीवर येणार आहे.  या नाटकात ओंकार झळकणार आहे.

"वस्त्रहरण" नाटकात ओंकार कोणती भूमिका साकारणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या या नाटकाच्या तालमी जोरात सुरु आहेत. शनिवार २७ एप्रिल दुपारी ४.३० वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात "वस्त्रहरण" नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. 'आई कुठे.. करते' फेम ओंकारला या कॉमेडी नाटकात पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही.

Web Title: Aai kuthe kay Karte fame ashutosh omkar govardhan will be seen in vastraharan natak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.