'पारू' मालिकेत नवा ट्विस्ट, अहिल्या पारूसोबत वैजूला घरात राहण्याची देईल परवानगी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 12:10 PM2024-04-30T12:10:10+5:302024-04-30T12:10:51+5:30

Paru Serial : 'पारू' ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. मालिकेत रोज काहीतरी घडामोडी घडताना दिसत आहे.

A new twist in 'Paru' serial, will Ahilya allow Vaiju to stay in the house with Paru? | 'पारू' मालिकेत नवा ट्विस्ट, अहिल्या पारूसोबत वैजूला घरात राहण्याची देईल परवानगी?

'पारू' मालिकेत नवा ट्विस्ट, अहिल्या पारूसोबत वैजूला घरात राहण्याची देईल परवानगी?

'पारू' (Paru Serial) ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. मालिकेत रोज काहीतरी घडामोडी घडताना दिसत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.  दामिनीचे कट कारस्थानं चालूच असून तिने वैजूला विकले आहे. आदित्य जाऊन वैजूला सोडवूं आणतो. मात्र आता तिच्या राहण्याची व्यवस्था कुठे करायचा हा प्रश्न आदित्यला पडला आहे.

'पारू' मध्ये सध्या खूप काही घडताना दिसत आहेत. एकीकडे गुरुजींनी अहिल्याला एक कठीण व्रत करायला सांगितले आहे. अहिल्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे  कठीण पद्धतीने उपवास करून व्रत करते. तर दुसरीकडे आदित्य एका डोळ्यांच्या प्रेमात पडतो, ते डोळे पारुचे आहेत याची त्याला कल्पना नाहीये. पारु अहिल्यादेवीची ओटी भरते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. 

दुसरीकडे दामिनीचे कट कारस्थानं चालूच आहेत, यावेळी तिचा डोळा वैजूवर आहे. दामिनीने वैजूला गायब केले आहे. वैजूला राहायला जागा नसल्यामुळे पारू टेन्शनमध्ये आहे. इकडे आदित्यला कळतं वैजू गायब झाली आहे आणि दामिनीने वैजूला विकले आहे. आदित्य जाऊन वैजूला सोडवूं आणतो. पण आता प्रश्न हा निर्माण झाला आहे की वैजूची राहायची व्यवस्था कुठे करू शकतो. यासाठी आदित्य अहिल्याकडे वैजुला घरात ठेवायची परवानगी मागायला जातो. पण अहिल्यादेवी वैजूला घरात ठेवायची परवानगी देतील ?  हे जाणून घेणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: A new twist in 'Paru' serial, will Ahilya allow Vaiju to stay in the house with Paru?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.