"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:18 IST2025-07-03T15:18:31+5:302025-07-03T15:18:56+5:30

प्रियदर्शन जाधव (Priydarshan Jadhav)चा नुकताच 'ऑल इज वेल' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

"A friend of mine does whatever it takes to stay in the limelight...", who is Priyadarshan Jadhav talking about? | "माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?

"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?

प्रियदर्शन जाधव (Priydarshan Jadhav) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. नुकताच त्याचा ऑल इज वेल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे लेखन प्रियदर्शनने केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रियदर्शनने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. एका मुलाखतीत त्याने कलाकार लाइमलाइटमध्ये येण्यासाठी धडपड करतात, यावर आपलं मत मांडले आहे. 

अभिनेता प्रियदर्शन जाधवने अलिकडेच आरपार युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी तो म्हणाला की, ''माझा एक मित्र आहे. मी नाव नाही घेणार त्याचं तो लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो. मी त्याचे नाव घेणार नाही. वाट्टेल ते इन द सेन्स उठसूठ उठून काहीतरी घाणेरडं काहीतरी असं नाही म्हणत लाइमलाइटमध्ये टिकून राहण्यासाठी तो विविध डायनामिक्सने स्वतःच्या करिअरकडे बघतो आणि तो त्याचा पुरेपूर वापर करुन घेतो. मला काही चुकीचं वाटत नाही. काहीच चुकीचं नाहीये त्याच्यात असं भासवलं जातं अरे हा स्वतःची किती लाल करतोय. असं ते चित्रीत होतं. त्याच्यावर लोक बोलतात किंवा असं वाटतं वाटू शकतं. पण तो त्या ठीके प्रोफेशनचा भाग आहे. ''

"यश त्याच्यासोबत येते असं म्हणतात..."

''सकारात्मकतेसह आपल्याला सर्वकाही सोबत घ्यावे लागेल. यश त्याच्यासोबत येते असं म्हणतात. तर ती बॅग घेऊन तुम्हाला ती खाली बॅग टाकली की ते सक्सेस सुटलं. तुम्हाला ते घ्यावंच लागणार खांद्यावर तुमच्या. त्याला पर्याय नाहीये'', असे प्रियदर्शन यावेळी म्हणाला.  

Web Title: "A friend of mine does whatever it takes to stay in the limelight...", who is Priyadarshan Jadhav talking about?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.