'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:19 IST2025-11-06T18:18:33+5:302025-11-06T18:19:05+5:30

खासगी गुप्तहेरने खुलासा केला आहे की, बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री 'वन नाईट स्टँड' करून पैसे कमावते.

A famous Bollywood actress earns money from 'one night stands', revealed by a detective Tanya Puri, she said - "By the hour..." | 'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

खासगी गुप्तहेर तान्या पुरीने खुलासा केला आहे की, बॉलिवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री 'वन नाईट स्टँड' करून पैसे कमावते. तान्याने सांगितले की, ही अभिनेत्री वेगवेगळ्या देशांमध्ये रिबन कापण्यासाठी जाते आणि हॉटेल्समध्ये लोकांना भेटते. गुप्तहेराने दावा केला की, अभिनेत्री तास आणि रात्रीनुसार क्लायंटकडून पैसे आकारते. तिच्या पार्टनरलाही तिच्या या 'काळ्या सत्या'बद्दल माहिती आहे.

सिद्धार्थ काननला दिलेल्या एका लेटेस्ट मुलाखतीत तान्या पुरी म्हणाली, "एक अभिनेत्री आहे जी काही काळापासून या इंडस्ट्रीत आहे आणि मध्ये ती जास्त काम करत नव्हती. पण तिची प्रतिमा चांगली, प्रतिष्ठित आहे आणि ती एका व्यक्तीसोबत गुंतलेली देखील आहे. मात्र, ती फक्त दाखवण्यासाठीच त्याच्यासोबत आहे. पाठीमागे ती प्रत्यक्षात हॉटेलमध्ये लोकांना भेटते, ती एका 'एस्कॉर्ट'चे काम करत आहे."

'अनेक लोकांशी आहे संबंध...'
या अभिनेत्रीबद्दल तान्या पुरी पुढे म्हणाली, "ती लोकांना भेटते, अपीअरन्ससाठीलोकांकडून पैसे घेते. पण पडद्यामागे खूप काही वेगळं चाललेलं आहे. तिचा जो पार्टनर आहे, तोच हे प्रकरण घेऊन आमच्याकडे आला होता आणि त्याने सांगितलं होतं की, 'मला शंका आहे की ती माझी फसवणूक करत आहे.' आता ती कोणासोबत तरी गुंतलेली आहे." गुप्तहेराने सांगितले, "जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने तिच्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवायला सुरुवात केली, तेव्हा कळलं की ती फक्त एका व्यक्तीसोबत गुंतलेली नाहीये. ती अनेक लोकांसोबत, वेगवेगळ्या देशांमध्ये 'स्पेशल अपीअरन्स' देते. ती जाते आणि लोकांना भेटते आणि त्याचे पैसे आकारते. कारण तिला 'फॅन्सी लाईफ' हवी आहे. त्यामुळे ती पडद्यावर काहीतरी वेगळी आणि पाठीमागे काहीतरी वेगळी आहे."

'पैशांच्या बदल्यात शारीरिक सुख देते'
या अभिनेत्रीबद्दल तान्या पुढे म्हणाली, "माझा अर्थ असा आहे की, ती लोकांना पैशांच्या बदल्यात शारीरिक सुख देते. ती पैसे घेते, आकारते. जेव्हा तिची टीम किंवा पुढचे लोक क्लायंट्सला कॉन्ट्रॅक्ट पाठवतात, तेव्हा त्यात ते असं लिहून पाठवतात की हा 'स्पेशल अपीअरन्स' आहे. तुम्ही तिच्यासोबत फक्त बोलण्याचे पैसे देता. पण पडद्यामागे फक्त बोलणं होत नाही." सत्य कळल्यानंतर अभिनेत्रीच्या पार्टनरने त्यांचं नातं संपवलं का, या प्रश्नावर तान्या पुरी म्हणाली, "नाही, त्याला ते नातं तोडायचंच नव्हतं. त्याला फक्त आपल्या मनाच्या शांतीसाठी काय चाललंय, हे जाणून घ्यायचं होतं, जेणेकरून बंद दरवाजामागे ती काय करत आहे हे त्याला माहीत आहे, हे तिला सांगू शकेल आणि तिला सांभाळून राहा असं सांगू शकेल."

या जोडप्याबद्दल तान्या सांगते, "त्याने ते नातं तोडलं नाही. उलट आमच्याकडे येणारे ९०% लोक नातं तोडत नाहीत. कारण तो पैसा त्यांच्या आयुष्यासाठी उपयुक्त ठरतो. तो त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करतो. ते एकत्र एक जॉईंट बिझनेस करत आहेत. त्या बिझनेसला निधी देण्यासाठी हा पैसा मदत करतो."

'महिन्यातून १० लोकांना भेटते...'
अभिनेत्रीबद्दल तान्या पुढे म्हणाली, "ती विवाहित नाहीये. ते दोघे फक्त एकमेकांसोबत गुंतलेले होते." तान्या पुढे म्हणाली की, ती महिन्यातून १० लोकांना भेटते. 'वन नाईट स्टँड'साठी आकारल्या जाणाऱ्या पैशांबद्दल तान्या म्हणाली, "पैसे खूप वेगवेगळे असतात, १० लाख एका रात्रीचे, ५ लाख एका रात्रीचे, २० लाख एका रात्रीचे. तुम्हाला काय हवे आहे, यावर अवलंबून आहे? तुमचे खिसे किती परवानगी देतात."

तान्या पुरीने पुढे या अभिनेत्रीबद्दल हिंट देताना म्हटले की, "हा एक सुप्रसिद्ध चेहरा आहे, जो सेलिब्रिटी एंडोर्समेंट्स करतो, रिबन कटिंग करतो, अपीअरन्सेस करतो."
 

Web Title : बॉलीवुड अभिनेत्री 'वन नाइट स्टैंड' से कमाती है, जासूस का खुलासा।

Web Summary : एक जासूस ने खुलासा किया कि एक बॉलीवुड अभिनेत्री विभिन्न देशों में 'वन नाइट स्टैंड' के माध्यम से पैसे कमाती है। वह ग्राहकों से घंटे और रात के हिसाब से चार्ज करती है। उसके साथी को इस रहस्य के बारे में पता है लेकिन वह इसे सहन करता है क्योंकि उसकी आय उनके संयुक्त व्यवसाय को निधि देती है।

Web Title : Bollywood actress earns from 'one night stands,' detective reveals.

Web Summary : A detective revealed a Bollywood actress earns money through 'one night stands' in different countries. She charges clients by the hour and night. Her partner knows about this secret but tolerates it because her income funds their joint business.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.