अभिनेत्यांचे 8 पॅक अॅब्ज तकलादू
By Admin | Updated: October 1, 2014 01:33 IST2014-10-01T01:33:07+5:302014-10-01T01:33:07+5:30
हृतिक रोशन, शाहरुख खान आणि आमिर खान हे स्टार आपल्या पिळदार शरीरयष्टी आणि 8 पॅक अॅब्जसाठी प्रसिद्ध आहेत.

अभिनेत्यांचे 8 पॅक अॅब्ज तकलादू
>हृतिक रोशन, शाहरुख खान आणि आमिर खान हे स्टार आपल्या पिळदार शरीरयष्टी आणि 8 पॅक अॅब्जसाठी प्रसिद्ध आहेत. ‘हॅप्पी न्यू ईअर’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी शाहरुखने जीममध्ये घाम गाळून 8 पॅक अॅब्ज बनविले. याचीच पुनरावृत्ती हृतिक रोशनने ‘बँगबँग’साठी केली. शाहरुख, हृतिकपासून प्रेरणा घेऊन आता सलमान खानदेखील सरसावला आहे. ‘बिगबॉस’मध्ये सोनाली राऊत हिने सलमानच्या 6 पॅक अॅब्जची स्तुती केली. त्याला उत्तर देताना सलमान म्हणाला की, सध्या माङो 8 पॅक्स नसले तरी दोन आठवडय़ांत ते दिसून येतील. हृतिक, शाहरुख आणि आमिरचे 8 पॅक्स वर्षभरातील फक्त तीन महिन्यांसाठीच असतात. इतर नऊ महिन्यांच्या कालावधीत त्यांना पॅक्सशिवाय राहावे लागते, असेही सलमानने स्पष्ट केले. सलमानचे 6 पॅक्स बनावट असून, ती केवळ संगणकाची करामत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे, हे विशेष.