पुण्यातल्या घटनेवर आधारित '७०२ दीक्षित'!
By Admin | Updated: January 1, 2016 03:23 IST2016-01-01T03:23:31+5:302016-01-01T03:23:31+5:30
चित्रपटाच्या शीर्षकावरूनच उत्कंठा ताणली जाईल, असे चित्रपट थोडे असतात. अशाच एका अनोख्या नावाचा चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. '७०२ दीक्षित' असे आगळेवेगळे

पुण्यातल्या घटनेवर आधारित '७०२ दीक्षित'!
चित्रपटाच्या शीर्षकावरूनच उत्कंठा ताणली जाईल, असे चित्रपट थोडे असतात. अशाच एका अनोख्या नावाचा चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. '७०२ दीक्षित' असे आगळेवेगळे शीर्षक असलेला हा चित्रपट पुण्यात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक शंख राजाध्यक्ष यानेच याबद्दल माहिती दिली. आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींपैकीच ही गोष्ट आहे, असेही तो सांगतो. या चित्रपटात गौरी निगुडकर, पल्लवी पाटील, विजय आंदळकर, जयवंत वाडकर, श्रीरंग देशमुख आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या नावाचे गूढ कायम राखत जयवंत वाडकर सांगतात, एखादी चूक किंवा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचे चित्रण या चित्रपटात केले आहे.