24 वर्षापूर्वी अशी दिसायची ऐश्वर्या राय, पाहा Modelling Daysचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 18:05 IST2017-03-30T12:31:58+5:302017-03-30T18:05:39+5:30

24 वर्षापूर्वी अशी दिसायची ऐश्वर्या राय, पाहा Modelling Daysचे फोटो
ब युटी विथ ब्रेन एंड टॅलेंट असा जिचा उल्लेख केला जातो.ऐश्वर्या राय बच्चन .अभ्यासासोबत तिला नृत्यामध्येही विशेष आवड होती.डॉक्टर,आर्टिकेक्ट बनण्याचा विचार करणा-या ऐश्वर्याची मॉडेलिंगमध्ये आवड वाढू लागली. त्यासाठी तिने मॉडेलिंगची ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली.कमी वयातच तिच्या सौंदर्याची जगभरात स्तुती होऊ लागली.जाहिरात विश्वात ऐश्वर्याच्या नावाचा बोलबाला होत असताना 1994 साली सुवर्णक्षण आला.ऐश्वर्या रायनं मिस वर्ल्ड किताब पटकावला आणि तिचं नाव सुवर्ण इतिहासात रचले गेले.यानंतर मात्र ऐश्वर्यानं मागं वळून पाहिलं नाही.24 वर्षानंतरही ऐश्वर्याचे चाहते तिच्या माडेलिंग दिवसातले फोटो पाहुन मनोमन खूश होत असतात.अभिनयासबोतच सामाजिक बांधिलकी जपत पेटा आणि नेत्रदानाच्या मोहिमेशी ती जोडली गेली.तिनं आवाहन करताच अनेकजण नेत्रदानासाठी पुढं सरसावले.तिनं मग मॉडेलिंग आणि सिनेमातच करियर करण्याचं ठरवलं.त्याच काळात विविध बॉलिवूड आणि हॉलीवुड सिनेमातून ऐशची नवनवीन रुपं रसिकांना पाहायला मिळाली.विशेष म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हलची ज्युरी बनण्याचा बहुमान मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली.आजही ऐशची जादू कमी झालेली नाही.आजही सारेच तिच्या अभिनयावर फिदा आहेत.गुरुच्या सुपरडुपर यशानंतर ऐश-अभि 20 एप्रिल 2007 रोजी रेशीमगाठीत अडकले.ऐश्वर्या राय बनली ऐश्वर्या राय बच्चन.लग्नानंतरही प्रोव्होक्ड, द लास्ट लिजेन, इन्थ्रिएन, द पिंक पँथर-टू, सरकार, रावण, रोबोट, एक्शन रिप्ले अशा सिनेमात ऐशची जादू पाहायला मिळाली..चित्रपटसृष्टीची सुपर हिरोईन ठरलेली ऐश आता पूर्णपणे आपल्या संसारात आणि आराध्यामध्ये दंग झाली. त्यामुळं तिला सुपर मॉम हे नावंही पडलं.
![]()
![]()
![]()
![]()