१५ जुलैपासून ‘मेरी आवाज ही पहेचान है’ निरोप घेणार!

By Admin | Updated: July 8, 2016 02:47 IST2016-07-08T02:47:38+5:302016-07-08T02:47:38+5:30

संगीताची पार्श्वभूमी आणि दिग्गज कलाकारांची फौज यामुळे मेरी आवाज ही पहेचान है ही मालिका सर्वार्थानं वेगळी ठरली. दीप्ती नवल, झरीना वहाब, अमृता राव, अदिती वासुदेव, पल्लवी जोशी

From 15th July 'My voice is only recognizable!' | १५ जुलैपासून ‘मेरी आवाज ही पहेचान है’ निरोप घेणार!

१५ जुलैपासून ‘मेरी आवाज ही पहेचान है’ निरोप घेणार!

संगीताची पार्श्वभूमी आणि दिग्गज कलाकारांची फौज यामुळे मेरी आवाज ही पहेचान है ही मालिका सर्वार्थानं वेगळी ठरली. दीप्ती नवल, झरीना वहाब, अमृता राव, अदिती वासुदेव, पल्लवी जोशी, एजाज खान असे कलाकार या मालिकेत पाहायला मिळाले. कधीही संपणार नाही असं कथानक असलं तरी आता ही मालिका रसिकांचा निरोप घेणार आहे.१५ जुलैपासून ही मालिका आॅफ एअर होणार आहे. संगीताच्या सूत्रानं एकमेकांशी घट्ट नातं जोडल्या गेलेल्या दोन बहिणींची कथा या मालिकेत रसिकांनी अनुभवली. तब्बल २१ वर्षांनंतरचा काळ दाखवत दोन्ही बहिणी भूतकाळात झालं गेलं विसरून एकत्र येतात यानं मालिकेचा शेवट होणार आहे. या मालिकेला म्हणावं तसं रेटिंग्स मिळालं नसलं तरी वेगळ्या प्रयोगामुळं मेरी
आवाज ही पहेचान है ही मालिका रसिकांच्या सदैव स्मरणात राहील.

Web Title: From 15th July 'My voice is only recognizable!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.