Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 03:18 PM2024-05-21T15:18:00+5:302024-05-21T15:21:18+5:30

Fackt Check : भारतीय मेट्रोचा विकास म्हणत बंगाल आणि त्रिपुरा भाजपने सिंगापूर येथील फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

Fact Check Of BJP shares photo of Singapore with claim of development in Indian Metro | Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो

Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो

Claim Review : बंगाल आणि त्रिपुरा भाजपने सिंगापूर येथील मेट्रोचा फोटो भारतीय विकास असल्याचा दावा करत फोटो शेअर केले आहेत
Claimed By : Social media
Fact Check : चूक

Created By: Boom
Translated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check : पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एक्स हँडलवरुन नुकतेच एलीव्हेटेड लाईनवरील मेट्रोचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोसोबत दावा करण्यात आला होता की, भारतात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने साध्य केलेल्या मेट्रो रेल्वे सेवांच्या विकासाचे प्रतिबिंब दर्शवत आहे.

फॅक्ट चेकनुसार हा फोटो सिंगापूरमधील जुरोंग ईस्ट एमआरटी स्टेशनचा आहे. सिंगापूर सरकारने जागतिक समुदायांसाठी वाहतुकीला चालना देण्यासाठी चालवलेल्या वेबसाइटवर हा शेअर केला गेला होता.

भाजपकडून काँग्रेस सरकारवर टीका करताना २०१४ नंतर मेट्रोच्या विकासाचा दावा करून हा फोटो व्हायरल केला जात आहे.

কর্মসংস্থান না বাড়লে কীভাবে ভারতের শহরে শহরে পৌঁছে গেল মেট্রো পরিষেবা?

কংগ্রেস বলবে, বিজেপি করবে!
#Vote4BJP#PhirEkBaarModiSarkarpic.twitter.com/Jmmb9ngsfK

— BJP West Bengal (@BJP4Bengal) May 12, 2024 " target="_blank">बंगाल भाजपने हा फोटो बंगाली भाषेतील कॅप्शनसह शेअर केला आहे. ज्याचा मराठीत अर्थ आहे की, रोजगार वाढवल्याशिवाय मेट्रो सेवा भारतीय शहरांपर्यंत कशी पोहोचली? काँग्रेस बोलणार, भाजप करणार.

या फोटोमधून दावा करण्यात येत आहे की, २०१४ मध्ये फक्त पाच शहरांमध्ये मेट्रो सुविधा सुरु होती. मात्र २०२४ मध्ये २० शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध आहे.

(अर्काइव्ह पोस्ट)

কর্মসংস্থান না বাড়লে কীভাবে ভারতের শহরে-শহরে পৌঁছে গেল মেট্রো পরিষেবা ?
কংগ্রেস বলবে, বিজেপি করবে !
pic.twitter.com/SVZQUTq0Nu

— BJP Tripura (@BJP4Tripura) May 15, 2024 " target="_blank">त्रिपुरा भाजपनेही जवळपास याच दाव्यासह हा फोटो शेअर केला आहे.

(अर्काइव्ह पोस्ट)

फॅक्ट चेक

या फोटोच्या संदर्भात गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च केल्यानंतर आम्हाला कळालं की, तो फोटो सिंगापूर सरकारच्या वेबसाइटवर जागतिक समुदायामध्ये देशाच्या वाहतूक सुविधांचा प्रचार करण्यासाठी प्रकाशित करण्यात आला होता.

हा फोटो वेबसाईटच्या 'लिव्हिंग इन सिंगापूर' सेक्शनमध्ये शेअर करताना लिहिलं होतं की, 'एका अशा देशात राहण्याची कल्पना करा, जिथे नवीन आणि जुन्यामध्ये सुसंवादी अस्तित्व असेल. जिथे उंच इमारती आणि निसर्गामध्ये नैसर्गिक सामंजस्य असेल.'

खाली भाजपच्या एक्स हँडलने शेअर केलेल्या फोटोची आणि सिंगापूर सरकारच्या वेबसाइटवर आढळलेल्या फोटीची तुलना करण्यात आली आहे.

आम्हाला आढळलं की, हाच फोटो सिंगापूरच्या स्ट्रेट्स टाइम्स या वृत्तपत्रातही प्रसिद्ध करण्यात आला होता. या बातमीमध्ये मूळ फोटोमध्ये असलेले व्हिज्युअल पाहता येतील. यामध्ये हा फोटो सिंगापूरमधील जुरोंग ईस्ट एमआरटी स्टेशनचा असल्याचे सांगण्यात आला होता.

याचा आधार घेत आम्ही गेटी इमेजसच्या वेबसाईटवर जुरोंग ईस्ट संदर्भातील कीवर्ड सर्च करुन पाहिले. याद्वारे आम्हाला या जागेचे अनेक फोटो मिळाले. खाली आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीचे छायाचित्रकार रोसलान रहमान यांनी २०१६ मध्ये घेतलेला फोटो आहे.

Embed from Getty Images

(सदर फॅक्ट चेक Boom या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check Of BJP shares photo of Singapore with claim of development in Indian Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.