Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:27 PM2024-05-23T12:27:45+5:302024-05-23T12:31:10+5:30

Fact Check: सोशल मीडियावर हे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

fact check bjp appoints prashant kishor national chief spokesperson letter viral on social media claim is false | Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

Claim Review : प्रशांत किशोर यांना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते केल्याबाबतचे एक पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: Aaj Tak
Translated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या सातपैकी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, उर्वरित टप्प्यातील मतदान काहीच दिवसांत होणार आहे. ०४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. तत्पूर्वी, राजकारणातील चाणक्य म्हणून ख्याती असलेले प्रशांत किशोर यांनी भाजपा, मोदी सरकार आणि लोकसभा निवडणुकीतील विरोधकांचे स्थान अशा विषयांवर अतिशय स्पष्ट शब्दांत काही मुलाखतींमधून भाष्य केले आहे. तसेच भाजपाला या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळू शकेल, असा दावाही केला आहे. 

राजकीय सल्लागार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे का? सोशल मीडियावर एका पत्राचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने प्रशांत किशोर यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती केल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल फोटोमध्ये भाजपच्या कथित लेटरहेडचा स्क्रीनशॉट दिसत आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रशांत किशोर यांची तत्काळ प्रभावाने राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे, असे यात म्हटल्याचे दिसत आहे.

एका एक्स युजरने या पत्राचा फोटो  शेअर केला असून, भाजपाच्या बी टीम प्रशांत किशोरचे अभिनंदन, ते बिहार बदलण्यासाठी निघाले होते, पण ते स्वतः बदलले होते. ज्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली होती, तिथे तो ढोंगी पोहोचला आहे, असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टचे अर्काइव्ह वर्जन पाहिले जाऊ शकते. 

हे पत्र फेसबुक आणि एक्सवर इतर अनेक युजर्सनी शेअर केले आहे.

फॅक्ट चेकमध्ये हे पत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे. प्रशांत किशोर यांनी याला दुजोरा दिला आहे. जन सुरज पक्षानेही हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. जन सुराज पार्टीच्या

Look at the irony! @INCIndia, @RahulGandhi
You all talk about fake news and claim to be the victims. Now see yourself how the head of Communications of Congress Party, @Jairam_Ramesh, apparently a senior leader, is personally circulating a fake document.@delhipolicepic.twitter.com/NJFrKhznU9

— Jan Suraaj (@jansuraajonline) May 22, 2024 " target="_blank">एक्स हँडलवरील ट्विटद्वारे काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यावर हे बनावट पत्र शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जन सुराज पक्षाच्या ट्विटमध्ये व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट आहे, ज्यावरून असे दिसते आहे की, जयराम रमेश यांनी हे पत्र कुणाला तरी पाठवले आहे. तथापि, या स्क्रीनशॉटचे सत्य काय आहे याची आम्ही येथे पुष्टी करू शकत नाही. 

या बनावट व्हायरल पत्रावर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांची कथित स्वाक्षरी पाहायला मिळते. अरुण सिंग यांच्याशीही संपर्क साधला असता, हे पत्र बनावट असल्याचेही त्यांनी सांगितले.

निष्कर्ष 

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपामध्ये प्रवेश केल्याचा खोटा दावा करून संभ्रम पसरवला जात आहे. दरम्यान, २०१९ च्या तुलनेत लोकसभा निवडणुकीत एनडीए कमकुवत होणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी नुकतेच म्हटले आहे. वाईट निकाल लागल्यास राहुल गांधींनी राजकारणातून माघार घेण्याचा विचार करावा, असेही ते म्हणाले आहेत.

(सदर फॅक्ट चेक Aaj Tak या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

 

Web Title: fact check bjp appoints prashant kishor national chief spokesperson letter viral on social media claim is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.