न्यूड एमएमएसवर नेहा महाजनचा खुलासा

By Admin | Published: June 29, 2016 12:34 AM2016-06-29T00:34:15+5:302016-06-29T00:34:15+5:30

अभिनेत्री नेहा महाजन तिच्या न्यूड एमएमएसमुळे सध्या चर्चेत आलीय.

Neha Mahajan's disclosure on Nude MMS | न्यूड एमएमएसवर नेहा महाजनचा खुलासा

न्यूड एमएमएसवर नेहा महाजनचा खुलासा

googlenewsNext


अभिनेत्री नेहा महाजन तिच्या न्यूड एमएमएसमुळे सध्या चर्चेत आलीय. हॉलीवूड स्टाईलने नेहाने स्वत:ला एक्स्पोझ केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय. सोशल मीडिया आणि व्हॉट्स अ‍ॅपवर याच व्हिडीओची चर्चा आहे. छडङटअळ.उडट नेसुद्धा हा व्हिडीओ शेअर करताच, तो तुफान हिट ठरलाय. दिवसभरात १३ हजार नेटिझन्सनी हा व्हिडीओ पाहिलाय. छडङटअळ.उडट वरही सध्या याच व्हिडीओची चर्चा सुरू आहे. नेहाचा हा पब्लिसिटी स्टंट आहे की काय, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, हा एमएमएस म्हणजे पैशांसाठी किंवा पब्लिसिटीसाठी केलेला स्टंट नसून, एका सिनेमातला सीन असल्याचा खुलासा नेहाने ‘लोकमत सीएनएक्स’कडे केलाय.
वैचारिक प्रगल्भतेतून घेतलेला निर्णय
नेहा सांगते, ‘पेटेंड हाउस’ नावाचा मल्याळी सिनेमा करत असून, त्यातील भूमिकेची गरज म्हणून हा सीन केलाय. एक वृद्धत्वाकडे झुकलेला लेखक हे या सिनेमातलं प्रमुख पात्र. या लेखकाला मृत्यू खुणावतोय आणि त्याचा परिणाम म्हणून स्वत:च्या गत आयुष्याकडे पाहाताना, तो त्याच्यातल्या स्त्री आणि पुरुष या प्रवृत्ती त्याला दिसतात. या स्त्री प्रवृत्तीची एक प्रतिमा म्हणजे माझे पात्र. ही अतिशय आव्हानात्मक भूमिका असून, त्यात काही प्रमाणात नग्नता असली, तरी यात बीभत्सतेचा लवलेशही नाही, याची खात्री पटल्यानंतरच ही भूमिका मी स्वीकारली. ही भूमिका साकारणे म्हणजे, वैचारिक प्रगल्भतेतून घेतलेला निर्णय होता. सिनेमा पूर्ण संदर्भासहित पाहिला, तर या न्यूड दृश्यांविषयीचा दृष्टिकोन बदलेल, याची खात्री आहे, असेही नेहाने ‘सीएनएक्स’शी संवाद साधताना म्हटलेय.
आधी सिनेमा बघा मगच प्रतिक्रिया द्या
नेहाने मराठी, हिंदी आणि या मल्याळी सिनेमाआधी दोन आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्येही काम केलेय. कलाकार म्हणून कथा आवडली आणि जे काही आव्हानात्मक असेल, ते-ते करायला आवडते आणि ते करते, असेही नेहाने स्पष्ट केलेय. कलेसाठी कोणत्याच गोष्टीचे नियम आणि बंधने नाहीत. परदेशात या गोष्टी चालतात आणि आपल्याकडे नाही, असे एक कलाकार म्हणून मला वाटत नाही, असेही नेहाने सांगितलेय. आपल्या अभिनयातून योग्य तो संदेश पोहचणे तिला महत्त्वाचे वाटते. या मल्याळी सिनेमातल्या भूमिकेत सौंदर्य दडले असल्याचेही तिचे म्हणणे आहे. या भूमिकेविषयी आणि न्यूड सीनबद्दल आपल्या पालकांनाही पूर्ण कल्पना दिल्याचे नेहाने सांगितलेय. माझ्या आई वडिलांना या सिनेमातल्या भूमिकेचे गांभीर्य समजले आणि त्यांनीही या सीन्ससाठी पूर्णपणे पाठिंबा दिला. माझी आई इंग्रजी विषयाची प्राध्यापिका आहे आणि वडील लेखक आहेत. त्यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. त्यांनाही याबाबत सगळी कल्पना आणि जाणीव आहे. इतकेच नाही, तर या माझा मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही आपल्या भूमिकेचे कौतुक केलेय, असे नेहाने सांगितले.
आपल्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन तिने तिच्या फॅन्सना आणि रसिकांना केलेय. जसा आपल्या विचारांना पटला, तसा तुमच्या विचारांना पटणारा हा मल्याळी सिनेमा आणि भूमिका असल्याचे नेहाने म्हटलेय. त्यामुळे आधी सिनेमा बघा आणि मगच त्यावर प्रतिक्रिया द्या, थेट प्रतिक्रिया आणि टीका करणे चुकीचे असल्याचे आवाहनही तिने केलेय.
>कथेची गरज असेल तर काही वावगं नाही
सिनेमाच्या पटकथेची मागणी असल्यास, कलाकारने अशा प्रकाराचे सीन देण्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. नेहासोबत मी काम केलेले आहे. नेहा ही खूप चांगली अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने कोणतीही गोष्ट करताना नक्कीच विचार करूनच केला असेल. मी तो सिनेमा पाहिलेला नाही, पण दृष्यांची गरज असल्यास तिने सीन दिला असेल, तर त्यात काहीही वावगं वाटत नाही.
- आदिनाथ कोठारे, अभिनेता
मराठी प्रेक्षक स्वीकारणारच नाहीआपली मराठी मुलगी म्हणून मराठी प्रेक्षक तर या दृश्याला स्वीकारणारच नाही. अजूनही मराठी प्रेक्षक अशा गोष्टीं स्वीकारण्यासाठी तयार नाहीये. एका कलाकाराने किती कपडे घालावे किंवा त्यानं कशा प्रकारच्या भूमिका कराव्यात, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यासाठी कलाकाराचीही मानसिकता तितकीच मह्त्त्वाची आहे. एखादा कलाकार निगेटिव्ह रोल करत असला, तरी आपला प्रेक्षक त्याच्यावर चिडतो की, त्याने असं का केलं असावं, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतात, इतका कलाकारांप्रती आपला प्रेक्षक भावुक असतो.
- क्रांती रेडकर, अभिनेत्री, दिग्दर्शिका

Web Title: Neha Mahajan's disclosure on Nude MMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.