नसिरुद्दीन शाह म्हणाले, "युपीत लव्ह जिहादचा तमाशा"; रत्ना पाठक यांच्यासोबतच्या विवाहाबातही केला खुलासा

By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 12:08 PM2021-01-18T12:08:20+5:302021-01-18T12:11:35+5:30

आपल्या लग्नादरम्यान घडलेल्या गोष्टींबाबतही दिली माहिती

Naseeruddin Shah furious at Love Jihad tamasha in UP spoke on ratna pathak shah marriage | नसिरुद्दीन शाह म्हणाले, "युपीत लव्ह जिहादचा तमाशा"; रत्ना पाठक यांच्यासोबतच्या विवाहाबातही केला खुलासा

नसिरुद्दीन शाह म्हणाले, "युपीत लव्ह जिहादचा तमाशा"; रत्ना पाठक यांच्यासोबतच्या विवाहाबातही केला खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या लग्नादरम्यान घडलेल्या गोष्टींबाबतही दिली माहितीलव्ह जिगादवरून सुरू असलेल्या छळामुळे तरूणांना दु:ख, नसिरुद्दीन शाह यांचं वक्तव्य

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी लव्ह जिहादवर आपलं मत व्यक्त केलं. हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील दुरावा कायम राहावा यासाठी लव्ह जिहाद या शब्दाचा वापर करण्यात येत असल्याचं नसिरुद्दीन शाह म्हणाले. "माझ्या आईनं माझ्या लग्नाच्या वेळी रत्ना पाठक हा धर्मपरिवर्तन करणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी आईला नाही असं उत्तर दिलं होतं. मी कायमच हिंदू महिलेसोबत माझा विवाह हे या समाजासाठी उदाहरण ठरेल असा विचार केला. आमच्या मुलांना आम्ही प्रत्येक धर्माबाबत सांगितलं आहे. त्यांनी कोणत्याही एका धर्माच्या मार्गावर जा असं आम्ही सांगितलं नाही. मतभेद हळूहळू कमी व्हावे असं आमचं मानणं आहे," असंही ते म्हणाले. 

"लव्ह जिहादसारख्या गोष्टी राजकारणामुळे आल्या आहेत. माझी आई अशिक्षित होती. तिनं मला परंपरागत वातावणात मोठं केलं. दिवसात पाच वेळा नमाज पठण होतं होतं. प्रत्येक वेळी रोजा ठेवला जायचा, हज यात्रा केली जातहोती. परंतु लग्नानंतर आईनं मला सांगितलं तुला लहानपणी शिकवलेल्या गोष्टी कशा बदलू शकतील. धर्मपरिवर्तन करणं योग्य नाही," असंही आईनं सांगितल्याचं नसिरुद्दीन शाह म्हणाले. कारवां-ए-मोहब्बत नामाच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. ज्या प्रकारे समाजात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत यावरून चिंता वाटत आहे. उत्तर प्रदेशात लव्ह जिहादचा तमाशा सुरू आहे. या शब्दाचा वापर करणाऱ्यांचा त्याचा अर्थही माहित नसल्याचं ते म्हणाले. 

यावेळी त्यांना मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येबाबत प्रश्न विचारण्यात आला. "भारतात मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक होईल हे मानेल असा कोणी मुर्ख आपल्याकडे नसेल. याबाबत विचार केला जाऊ शकत नाही. हिंदू आणि मुस्लीम यांच्यात दुरावा निर्माण व्हावा यासाठी लव्ह जिहाद हा शब्द वापरला जात आहे. आंतरधर्मिय विवाह होऊ नये यासाठी हे केलं जात आहे," अंसही शाह म्हणाले.

तरूणांना दु:ख

"तरूण वर्ग लव्ह जिगादच्या नावावरून सुरू असेलेल्या छळामुळे दु:खी आहे. ज्याचं आम्ही स्वप्न पाहिलं होते ते हे जग नाही," असंही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायद्याला मंजुरी देण्यात आली. यात बळजबरीनं करण्यात येणाऱ्या धर्मांतरणावर कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. हरयाणा आणि मध्यप्रदेशनंही या दिशेनं पाऊल उचललं आहे. 
 

Web Title: Naseeruddin Shah furious at Love Jihad tamasha in UP spoke on ratna pathak shah marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.