Mirzapur 2 : अली फजल करणार होता मिर्झापूरच्या मुन्ना त्रिपाठीची भूमिका, जाणून घ्या आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी

By अमित इंगोले | Published: October 23, 2020 09:27 AM2020-10-23T09:27:08+5:302020-10-23T09:46:51+5:30

'मिर्झापूर २' ही वेबसीरीज अ‍ॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध असून एका नवा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज आहे. या सीझन २ च्या निमित्ताने या वेबसीरीजबाबतच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mirzapur 2 : Interesting facts about the recently released web series Mirzapur season two | Mirzapur 2 : अली फजल करणार होता मिर्झापूरच्या मुन्ना त्रिपाठीची भूमिका, जाणून घ्या आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी

Mirzapur 2 : अली फजल करणार होता मिर्झापूरच्या मुन्ना त्रिपाठीची भूमिका, जाणून घ्या आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी

googlenewsNext

ज्या वेबसीरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते ती 'मिर्झापूर २' सीरीज रिलीज झाली आहे. सीझन २ मध्येही हिंसा, सूडाची भावना आणि अनेक अ‍ॅक्शन सीक्वेंस बघायला मिळाले आहेत. ही सीरीज अ‍ॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध असून एका नवा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज आहे. या सीझन २ च्या निमित्ताने या वेबसीरीजबाबतच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) मुन्ना त्रिपाठीची भूमिका साकारणाऱ्या दिव्येंदु शर्माला आधी विक्रांत मेसीची भूमिका म्हणजे बबलू पंडीतची भूमिका ऑफर करण्यात आली होती. दिव्येंदुने सांगितले होते की, त्याला ही स्क्रीप्ट इतकी आवडली होती की, तो यात कोणतीही भूमिका साकारण्यास तयार होता. जेव्हा कास्ट फायनल झालं तेव्हा दिव्येंदुला मुन्ना त्रिपाठीची भूमिका मिळाली. (Mirzapur 2 : मुन्ना भैयाच्या रॅप सॉंगवर थिरकणार फॅन्स, व्हिडीओ झाला व्हायरल)

२) अली फजलने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला आधी या वेबसीरीजमध्ये मुन्ना त्रिपाठीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण त्यासोबतच त्याची गुड्डू पंडीतच्या भूमिकेसाठीही टेस्ट करण्यात आली होती. अखेर निर्णय घेण्यात आला की, तो गुड्डूची भूमिका साकारणार.

३) मिर्झापूरमध्ये कालीन भैयाची भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठीने ही वेबसीरीज दीड वर्ष पाहिली नव्हती. पंकजने याचं कारण त्याचं बिझी शेड्युल सांगितलं होतं. त्याने लॉकडाऊन दरम्यान वेबसीरीज पाहिली.

४) अखंडानंद त्रिपाठीच्या घरातील शॉट्सचं शूटींग वाराणसी येथील मोती झील हवेलीमध्ये करण्यात आलं. प्रॉडक्शन टीमने ही हवेली १० दिवसांसाठी भाड्याने घेतली होती.

५) बबलूची ब्लॅक डायरी जी सीझन २ मध्येही गोलूजवळ दाखवण्यात आली आहे. या डायरीवर मोठ्या अक्षरात टी लिहिला आहे. ज्याचा अर्थ त्रिपाठी होतो. ही डायरी प्रॉडक्शन डिझाइन टीमने क्रिएटीव्ह डिस्कशननंतर कस्टमाइज केली होती.

६) प्रॉडक्शन टीमने कालीन भैयाच्या धंद्यासाठी फेक अफीमचा वापर केला होता या सीझनमध्ये याला बर्फी म्हटलं गेलं आहे. टीमने अशाप्रकारची दोन अफीम तयार केले होते. यातील एक काळ्या मातीपासून तयार केलं तर दुसरं डार्क चॉकलेट आणि दुधापासून तयार केलं. 
 

Web Title: Mirzapur 2 : Interesting facts about the recently released web series Mirzapur season two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.