धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागणाऱ्या मित्राचे धडावेगळे केले शीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 15:22 IST2021-07-09T15:08:11+5:302021-07-09T15:22:38+5:30
youth killed his friend by axe: पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि निर्घृण खून केला

धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागणाऱ्या मित्राचे धडावेगळे केले शीर
ग्वालियर: उसने घेतलेले पैसे परत मागितल्यामुळे कुऱ्हाडीने वार करुन मित्राचे शीर धडापासून वेगळे केल्याची धक्कादायक घटना ग्वालियरमध्ये घडली आहे. खून केल्यानंर शरीराची विल्हेवाट लावता न आल्यामुळे आरोपीने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री घडलेली ही घटना पोलिस स्टेशनपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर घडली.
आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इम्रान खान आणि मृत अमृतलाल जाटव(वय 35) चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वी अमृतलालने त्याचे घर विकले होते. घर विकून मिळालेल्या पैशातून 4 लाख रुपये त्याने इम्रानला उसने दिले. पण, काही दिवसांपासून अमृतलालने इम्रानकडे पैसे परत देण्याची मागणी सुरू केली. लवकरच पैसे परत न केल्यास खोट्या खटल्यात अडकवण्याची धमकीही दिली होती.
पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलवाले
आरोपीने पुढे सांगितले की, माझी आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. सध्या त्याला मी पैसे देऊ शकत नव्हतो. पण, तो ऐकायला तयार नव्हता. पैसे देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकू लागला. या सर्व गोष्टींमुळे कंटाळून मी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी रात्री मी त्याला पैसे देण्याच्या बहण्याने घरी बोलावले. त्याला भरपूर दारू पाजली आणि दारुच्या नशेत असताना कुऱ्हाडीने वार करुन त्याचे मुंडके उडवले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.