चिखलीत महिलेचा खून, हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टीही लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 23:10 IST2021-08-05T23:10:08+5:302021-08-05T23:10:55+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला यांचा अजिज कुरेशी यांच्यासोबत विवाह झाला होता. परंतु त्या एकट्याच राहात होत्या

चिखलीत महिलेचा खून, हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टीही लावली
पिंपरी : घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून केला. हरगुडे वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे गुरुवारी (दि. ५) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कमला बाबूराव खानेकर उर्फ नूरजहाँ अजिज कुरेशी (वय ५५, रा. हरगुडेवस्ती, चिखली), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला यांचा अजिज कुरेशी यांच्यासोबत विवाह झाला होता. परंतु त्या एकट्याच राहात होत्या. बुधवारी (दि. ४) रात्री साडेनऊला त्यांच्या भाडेकरूसाेबत गप्पा मारून त्या त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने रुम भाड्याने मिळण्याकामी सकाळी साडेअकराच्या सुमारास कमला यांच्या घरी गेला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांना घराबाहेरून आवाज दिला. मात्र, कमला यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. कमला यांचे हातपाय बांधलेले आणि तोंडाला चिकटपट्टी लावलेली असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती त्वरित पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कमला यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.