ऑफिसमधील मॉब लिंचिंग! कर्मचाऱ्याला कंपनीतील सहकाऱ्यांनीच मारले; अपघात भासवायला गेले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:10 IST2022-11-07T15:10:03+5:302022-11-07T15:10:56+5:30
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये ही मॉब लिंचिंगची घटना घडली आहे.

ऑफिसमधील मॉब लिंचिंग! कर्मचाऱ्याला कंपनीतील सहकाऱ्यांनीच मारले; अपघात भासवायला गेले अन्...
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीची लिंचिंग झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, याची लिंचिंग त्याच्या ऑफीसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, हा माणूस कोलकाता येथील अनोंदणीकृत कंपनीत काम करत होता. अमित रंजन चटर्जी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅटर्जी यांना शनिवारी रात्री सहा तरुणांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनी एमआर बांगूर रुग्णालयाच्या डॉक्टरांना अपघातात जखमी झाल्याचा बनाव केला. मात्र, पीडितेला झालेल्या जखमा पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर संशय निर्माण झाला. जखमी व्यक्तीला उपचारादरम्यान वाचवता आले नाही, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला पकडले
रीजेंट पार्क पोलिस स्टेशनचे अधिकारी म्हणाले, 'रुग्णालय प्राधिकरणाने आम्हाला याची माहिती दिली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सोमनाथ चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले, तर पाच आरोपी तेथून पळून गेली. चक्रवर्ती यांना पोलिस कोठडीत टाकण्यात आले आहे. तपासादरम्यान असे आढळून आले की, भांडणानंतर चॅटर्जीला त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनीच बेदम मारहाण केली.