भरचौकात युवतीला मारहाण करत विनयभंग; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
By परिमल डोहणे | Updated: May 11, 2023 15:06 IST2023-05-11T15:05:47+5:302023-05-11T15:06:51+5:30
चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील घटना : एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

भरचौकात युवतीला मारहाण करत विनयभंग; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
चंद्रपूर : युवतीची छेड काढणाऱ्याला टोकल्यामुळे मारहाण करून त्या युवतीला भर चौकातच मारहाण करून शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना चंद्रपूरातील इंदिरानगर येथे मंगळवारी सायंकाळी घडली. पीडित युवतीच्या तक्रारीवरून एकाच कुटूंबातील विजय वऱ्हाळे (२४), आकाश वऱ्हाळे (५०), यांच्यासह एका महिलेवर कलम ३५४ अ, २९४, ५०६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पीडीत युवती घरासमोरील परिसरात मंगळवारी सायंकाळी उभी असताना विजय वऱ्हाळे याने युवतीची छेळ काढत शिवीगाळ केली. यावेळी त्या युवतीने त्याला टोकले. यावरून दोघात वाद झाला. दरम्यान विजयचे आई-वडील दाखल झाले. या सर्वांनी त्या युवतीला शिवीगाळ करून मारहाण करीत विनयभंग केला. तसेच मारण्याची धमकीसुध्दा दिली. अशी तक्रार पीडीत युवतीने रामनगर पोलिसात दिली. तक्रारीवरून विजय वऱ्हाळे, आकाश वऱ्हाळे, व एका महिलेविरुद्ध विविध कलमानव्ये रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.