"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम

Aiden Markram emotional, chokers word, WTC Final 2025 SA vs AUS: तब्बल २७ वर्षांनी द. आफ्रिकेने जिंकली ICC ट्रॉफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:39 IST2025-06-15T13:38:12+5:302025-06-15T13:39:39+5:30

whatsapp join usJoin us
wtc final 2025 aus vs sa aiden markram gets emotional chokers tag temba bavuma australian players teasing | "आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम

"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Aiden Markram emotional, chokers word, WTC Final 2025 SA vs AUS: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या तिसऱ्या हंगामाच्या (२०२३-२५) अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव केला. लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी २८२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. ते त्यांनी खेळाच्या चौथ्या दिवशी पाच गडी राखून पार केले. मोठ्या स्पर्धांमध्ये आणि अनेकदा मोक्याच्या क्षणी मार खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने अखेर स्वतःवरील 'चोकर्स' हा टॅग पुसून टाकला. सामनवीराचा किताब मिळाल्यानंतर शतकवीर एडन मार्करमने भावनिक होत मत व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद जिंकणारा तिसरा संघ ठरला. याआधी न्यूझीलंडने पहिला तर ऑस्ट्रेलियाने दुसरा हंगाम जिंकला होता. या जेतेपदाच्या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने स्वतःवरून चोकर्सचा टॅग देखील काढून टाकला. नॉकआउट सामन्यांमध्ये पराभूत होण्याच्या सवयीमुळे चाहते बराच काळ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 'चोकर्स' म्हणून ट्रोल करत होते. WTC फायनल दरम्यानही ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर स्लेजिंग करण्यात मग्न होते, पण मार्करमने त्यांनी आपल्या खेळीने आणि सामना संपल्यानंतर वाणीने उत्तर दिले.

मार्करामचे भावनिक विधान

एडन मार्करम सामनावीराचा किताब मिळाल्यानंतर काहीसा भावनिक झाला आणि म्हणाला, "चोकर्स' हा शब्द पुन्हा कधीही दक्षिण आफ्रिकेसाठी वापरला जाणार नाही अशी मला आशा आहे. आम्हाला पुन्हा कधीही हा शब्द (चोक) ऐकावा लागला नाही तर बरे होईल. यावेळी आम्ही आमच्यावर असलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली आहे आणि चोकर्सचा टॅग काढून टाकला आहे, ही आमच्या संघासाठी मोठी गोष्ट आहे."

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ २७ वर्षांनंतर आयसीसी जेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला. यापूर्वी, त्यांनी १९९८ मध्ये (विल्स इंटरनॅशनल कप) पहिले आयसीसी जेतेपद जिंकले होते. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयात एडन मार्कराम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धावांचा पाठलाग करताना मार्करामने १३६ आणि बावुमाने ६६ धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये १४७ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या मुठीत आला. त्यानंतर ५ गडी राखून ते 'चॅम्पियन' बनले.

Web Title: wtc final 2025 aus vs sa aiden markram gets emotional chokers tag temba bavuma australian players teasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.