WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 03:18 PM2021-06-24T15:18:00+5:302021-06-24T15:19:05+5:30

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : न्यूझीलंडने  आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला.

WTC final 2021 Ind vs NZ Test : Top 5 Highest Run Scorers, Top 5 highest wicket takers In The Tournament, know all stats | WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा!

WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा!

Next

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप जेतेपदाच्या हुकलेल्या संधीच्या जखमा सोबत घेऊन मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंड संघानं बुधवारी साऊदॅम्प्टनवर इतिहास रचला. न्यूझीलंडने  आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं पहिल्या डावात २४९ धावा केल्या. टीम इंडियाला दुसऱ्या डावात १७० धावाच करता आल्या अन् किवींनी १३९ धावांचे लक्ष्य सहज पार केले. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसत नाही.. जाणून घेऊयात स्पर्धेतील आकडेवारी...

सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज ( Top 5 Highest Run Scorers)
मार्नस लाबुशेन ( ऑस्ट्रेलिया) - १३ सामने, ७८.८२ची सरासरी, १६७५ धावा, १००/५० - ५/९
जो रूट ( इंग्लंड) -२० सामने, ४७.४३ ची सरासरी, १६६० धावा, १००/५० - ३/८
स्टीव्ह स्मिथ ( ऑस्ट्रेलिया) - १३ सामने , ६३.८५ची सरासरी, १३४१ धावा, १००/५० - ४/७
बेन स्टोक्स ( इंग्लंड) - १७ सामने, ४६ ची सरासरी, १३३४ धावा, १००/५० - ४/६
अजिंक्य रहाणे ( भारत) - १८ सामने, ४२.९२ ची सरासरी, ११७४ धावा, १००/५० - ३/६

सर्वाधिक विकेट्स ( Most Wickets)
आर अश्विन ( भारत) - १४ सामने, ७१ विकेट्स, ७ -१४५ सर्वोत्तम कामगिरी
पॅट कमिन्स ( ऑस्ट्रेलिया) - १४ सामने, ७० विकेट्स, ५-२८ सर्वोत्तम कामगिरी
स्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड) - १७ सामने, ६९ विकेट्स, ६-३१ सर्वोत्तम कामगिरी
टीम साऊदी ( न्यूझीलंड ) - ११ सामने, ५६ विकेट्स, ५-३२ सर्वोत्तम कामगिरी
नॅथन लियॉन ( ऑस्ट्रेलिया) - १४ सामने, ५६ विकेट्स, ६-४९ सर्वोत्तम कामगिरी

सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ( Highest individual score)
डेव्हिड वॉर्नर ( ऑस्ट्रेलिया ) - ३३५* धावा, ४१८ चेंडू, ३९ चौकार व १ षटकार वि. पाकिस्तान, अॅडलेड
झॅक क्रॅवली ( इंग्लंड) - २६७ धावा, ३९३ चेंडू, ३४ चौकार व १ षटकार वि. पाकिस्तान, साऊदॅम्प्टन
विराट कोहली ( भारत) - २५४* धावा, ३३६ चेंडू, ३३ चौकार व २ षटकार वि. दक्षिण आफ्रिका, पुणे
केन विलियम्सन ( न्यूझीलंड) - २५१ धावा, ४१२ चेंडू, ३४ चौकार व २ षटकार वि. वेस्ट इंडिज, हॅमिल्टन
दिमुथ करुणारत्ने ( श्रीलंका) - २४४ धावा, ४३७ चेंडू, २६ चौकार वि. बांगलादेश, पल्लेकेले

सर्वोत्तम वैयक्तिक गोलंदाजी (Best bowling figures in an innings) 
लसिथ इम्बुलडेनिया ( श्रीलंका) - ७-१३७ वि. इंग्लंड
आर अश्विन ( भारत) - ७-१४५ वि. दक्षिण आफ्रिका
जसप्रीत बुमराह ( भारत) - ६-२७ वि. वेस्ट इंडिज
स्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड ) - ६-३१ वि. वेस्ट इंडिज
अक्षर पटेल ( भारत) - ६ -३८ वि. इंग्लंड

सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी ( Best bowling figures in a match) 
अक्षर पटेल ( भारत) - ११-७० वि. इंग्लंड
कायले जेमिन्सन ( न्यूझीलंड) - ११-११७ वि. पाकिस्तान
प्रविण जयविक्रमान ( श्रीलंका) - ११ -१७८ वि. बांगालदेश
स्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड) - १०-६७ वि. वेस्ट इंडिज
हसन अली ( पाकिस्तान) - १०-११४ वि. दक्षिण आफ्रिका

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Top 5 Highest Run Scorers, Top 5 highest wicket takers In The Tournament, know all stats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app