WTC Final 2021 IND vs NZ : संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी आर अश्विन आला धावून, नोंदवला मोठा विक्रम

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : आर अश्विननं न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची चुरस अधिक वाढवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 09:13 PM2021-06-23T21:13:33+5:302021-06-23T21:14:53+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : With 71 wickets Ravi Ashwin is now the leading wicket taker of WTC, NZ 2/44 | WTC Final 2021 IND vs NZ : संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी आर अश्विन आला धावून, नोंदवला मोठा विक्रम

WTC Final 2021 IND vs NZ : संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी आर अश्विन आला धावून, नोंदवला मोठा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे पहिल्या डावातील २१७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं २४९ धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सन ( ४९) आणि टीम साऊदी ( ३०) यांनी दमदार खेळ केला.

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : आर अश्विननं न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची चुरस अधिक वाढवली आहे. भारतानं विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना किवींचे दोन्ही सलामीवीर ४४ धावांवर माघारी परतले आहेत. या कामगिरीसह आर अश्विननं WTCमध्ये विक्रमाला गवसणी घातली. 

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या सहाव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच भारताचे तगडे फलंदाज माघारी परतले. त्यानंतर रिषभ पंत वगळता तळाच्या फलंदाजांनाही अपयश आलं अन् टीम इंडियाचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. टीम साऊदीला चार, ट्रेंट बोल्टला ३ व कायले जेमिन्सनला २ विकेट्स आणि निल वॅगनरनं एक विकेट घेतली.  कोहली ( १३), पुजारा ( १५) आणि रहाणे ( १५) माघारी परतल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली. टीम इंडियाची अवस्था ५ बाद १०९ अशी केली. रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु निल वॅगनरनं ही जोडी तोडली. त्यानंतर ट्रेंट बोल्टनं एकाच षटकात रिषभ व आर अश्विनला बाद केले. बघता बघता भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. आर अश्विननं सारा गेम पलटवला. त्यानं दोन्ही सलामीवीरांना ४४ धावांवर माघारी पाठवले. कर्णधार केन विलियम्सनलाही त्यानं पायचीत पकडले होते, परंतु DRSनंतर केन नाबाद असल्याचा निर्णय देण्यात आला. विराटच्या चेहऱ्यावरील हास्य हरवले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक ७१ विकेट्सचा विक्रम आर अश्विननं पटकावला. त्यानं पॅट कमिन्सचा ७० विकेट्सचा विक्रम मोडला. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड ( ६९), टीम साऊदी ( ५६) आणि नॅथन लियॉन ( ५६) यांचा क्रमांक येतो.  IND vs NZ World Test Championship, WTC Final Today


Think Positive 
भारतानं याआधी कसोटी क्रिकेटमध्ये १७० धावांचा यशस्वी बचाव केला होता. अहमदाबाद कसोटी त्यांनी १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला १०५ धावांवर रोखले होते. त्याआधी २००४मध्ये मुंबई कसोटीत १०८ धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ९३ धावांवर गुंडाळले होते, तर १९८१साली मेलबर्न येथे १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ८३ धावांवर रोखले होते.

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : With 71 wickets Ravi Ashwin is now the leading wicket taker of WTC, NZ 2/44

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.