भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना बुधवारी हॅमिल्टन येथे होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-0 अशी आघाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान वाचवण्याचे दडपण यजमान न्यूझीलंडवर असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चमूत रिलॅक्स वातावरण आहे. टीम इंडियानं सोमवारी ऑकलंड ते हॅमिल्टन असा बस प्रवास केला. त्यानंतर हॅमिल्टन येथे पोहोचताच टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सरावही केला. पण, कर्णधार विराट कोहलीनं केलेला एक स्टंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट आपल्या फिटनेससाठी किती सजग आहे, हे सर्वांना माहीतीच आहे. त्यामुळे जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंमध्ये विराट अग्रस्थानी आहे. 31 वर्षीय विराटच्या याच फिटनेसनं सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापकीय समितीनं Yo-Yo चाचणी अनिवार्य केली होती. त्यामुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर सातत्यपूर्ण कामगिरी बरोबरच तंदुरुस्तीही तितकीच महत्त्वाची असल्याचा नियमच तयार झाला. यातून विराटचीही सुटका नाही.


विराटची फिटनेस पाहून अन्य खेळाडूंनाही प्रेरणा मिळते. विराटनं मंगळवारी शेअर केलेला व्हिडीओ पाहूनही तुम्ही थक्क व्हाल. सध्या त्याच्या याच व्हिडीओची चर्चा आहे. 

भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिले दोन्ही सामने सहज जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 

आयपीएल आयोजनासाठी अमेरिकन कंपनीला दिले जातात 35 कोटी, जाणून घ्या कारण

आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही...

हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य...

Video : महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत युजवेंद्र चहल भावूक, सांगितला 'कॉर्नर सीट' चा किस्सा

मुंबईत रंगणार आयपीएलचा अंतिम सामना; २४ मेला ठरणार विजेता

Web Title: Video : Virat Kohli stunt goes viral on social media, must watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.