Uncertainty looms over Hardik Pandya's selection as Sourav Ganguly confirms all-rounder 'is not fit' | हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य...

हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य...

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाता आले नाही. पण, या दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेतून तो कमबॅक करेल अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी, पांड्या वन डे मालिकेत टीम इंडियात पुनरागमन करेल, असेही सर्वांना वाटत होते. पण, तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्याच्या तंदुरुस्तीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष  सौरव गांगुलीनं मोठं विधान केलं आहे.

हार्दिक दुखापतीमुळे बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करेल अशी शक्यता होती, परंतु तसेही झाले नाही. तो अजूनही तंदुरुस्त नसल्यामुळे त्याची निवड न झाल्याच्या चर्चा होत्या, परंतु हार्दिक स्वतःच्या फिटनेसवर समाधानी नसल्यानं त्यानं किवी दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी हार्दिकनं टीम इंडियासोबत नेटमध्ये सरावही केला होता. भारतीय संघाचे साहाय्यक ट्रेनर योगेश परमार यांच्या देखरेखीखाली पांड्या तंदुरुस्तीसाठी सराव करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत पांड्या अखेरचा खेळला होता. त्यानंतर दुखापतीतून सावरण्यासाठी तो क्रिकेटपासून दूर आहे. 

Video: देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींनी हार्दिक पांड्याला केली गोलंदाजी अन्...

इंडियन प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग काऊंसीलच्या बैठकीनंतर गांगुलीनं पांड्याच्या दुखापतीबाबत सांगितले. तो म्हणाला,''हार्दिक सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. आणि तो स्थानिक क्रिकेट खेळणे अवघड आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी केली जाईल. पण, तुर्तास तरी पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्याला अजून बराच वेळ लागेल.''

Video : महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत युजवेंद्र चहल भावूक, सांगितला 'कॉर्नर सीट' चा किस्सा

‘खेलो इंडिया’ विजेत्यांना रोख पुरस्कार, क्रीडामंत्र्यांची घोषणा

मुंबईत रंगणार आयपीएलचा अंतिम सामना; २४ मेला ठरणार विजेता

राफेल नदाल, झ्वेरेव, थीएम व हालेप यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Web Title: Uncertainty looms over Hardik Pandya's selection as Sourav Ganguly confirms all-rounder 'is not fit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.