दाक्षिणात्य सुपर स्टार अल्लू अर्जुन यानं ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे आभार मानले आहेत. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे खेळाडू आपापल्या घरीच आहेत. वॉर्नरने या कालावधीत Tik Tok वर पदार्पण केले. बॉलिवूडचं आयटम साँग शीला की जवानी या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ त्यानं टिकटॉकवर अपलोड केला. त्यानंतर वॉर्नर सातत्यानं व्हिडीओ पोस्ट करत आहे. गुरुवारी त्यानं असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आणि अल्लू अर्जुनने तो पाहून वॉर्नरचे कौतुक केलेच, शिवाय आभारही मानले.
इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल ) सनरायझर्स हैदराबाद संघानं त्यांच्या कर्णधाराचा हा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत वॉर्नर आणि त्याची पत्नी 'बोटा बोम्बा' या तेलुगू गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हे गाणं अल्लू अर्जूनच्या अला वैकुंठपुरामलू या चित्रपटातील आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनने वॉर्नरचे आभार मानले.
वॉर्नरने आतापर्यंत टिकटॉकवर 14 व्हिडीओ अपलोड केले आहेत आणि त्याचे 10 लाख फॉलोअर्सही झाले आहेत.
पाहा त्याचा नवा व्हिडीओ.
फार कमी जणांना माहिती आहेत 'हिटमॅन' रोहित शर्माचे हे तीन विक्रम!
रोहित शर्माला बनायचं होतं गोलंदाज; आज जग त्याला 'हिटमॅन' म्हणून ओळखतं
रोहित शर्माचा फिल्मी अंदाज; गुडघ्यावर बसून रितिकाला केलेलं प्रपोज
त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; Sachin Tendulkarनं वाहिली श्रद्धांजली
रोहित शर्माला 'हिटमॅन' हे नाव कुणी दिलं? पाहा Video
प्रेक्षकांची सेफ्टी महत्त्वाची; Ajinkya Rahane बंद स्टेडियममध्ये IPL खेळण्यास तयार
Andre Russell ट्वेंटी-20 फ्रँचायझी मालकावर भडकला; केले गंभीर आरोप