मोठ्या भावाला कोरोना झाल्यानंतर सौरव गांगुलीनं केली कोरोना टेस्ट; रिपोर्ट आला समोर  

स्नेहाशीष कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सौरवही होम क्वारंटाईन झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 04:45 PM2020-07-25T16:45:09+5:302020-07-25T16:45:41+5:30

whatsapp join usJoin us
Sourav Ganguly corona report came negative | मोठ्या भावाला कोरोना झाल्यानंतर सौरव गांगुलीनं केली कोरोना टेस्ट; रिपोर्ट आला समोर  

मोठ्या भावाला कोरोना झाल्यानंतर सौरव गांगुलीनं केली कोरोना टेस्ट; रिपोर्ट आला समोर  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याचा मोठा भाऊ स्नेहाशीष यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सौरवनंही त्याची कोरोना चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट समोर आला आहे. सौरव गांगुलीत कोरोनाची कोणतीच लक्षणं जाणवत नव्हती, परंतु कुटुंबातील सदस्याला कोरोना झाल्यामुळे त्यानं चाचणी करून घेतली.  

England vs West Indies 3rd Test : 26 वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजानं केला पराक्रम!

स्नेहाशीष कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सौरवही होम क्वारंटाईन झाला. स्नेहाशीषवर कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. होम क्वारंटाईन झाल्यामुळे सौरव घरातूनच बीसीसीआयचं सर्व काम पाहत आहे. तो बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फेरसिंगनं संवाद साधत आहे. सौरव होम क्वारंटाईन झाल्यामुळे त्याच्या बंगल्यात होणाऱ्या रिअॅलिटी शो 'दादागिरी अनलिमिटेड'चे शूटिंग स्थगित केले गेले आहे. शुक्रवारी सौरवचा कोरोना रिपोर्ट आला असून तो निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. 

अम्फान वादळ: दहा हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी सौरव गांगुली रस्त्यावर!

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या 13 लाख 39,067 इतकी झाली आहे. त्यापैकी 8 लाख 50,295 रुग्ण बरे झाले आहेत, तर 31,425 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!

केमार रोचनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच बेन स्टोक्सची 'दांडी' गुल! 

140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video

शाब्बास Hima Das! आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक 'कोरोना वॉरियर्स'ना समर्पित!

मुंबई इंडियन्सच्या जेतेपदानंतर टीमसमोरच त्यानं केलं फिल्मी स्टाईल प्रपोज अन्...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी अन् चेन्नई सुपर किंग्स यूएईत लवकर दाखल होणार!

 

Web Title: Sourav Ganguly corona report came negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.