Jemimah Shreyanka Dance viral video: भारतीय महिला संघाने काही दिवसांपूर्वीच संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून महिलांचा वनडे वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदा जिंकला. या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, सध्या महिला क्रिकेटपटू एका दुसऱ्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त झाल्या आहेत. उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana Wedding) आज संगीतकार पलाश मुच्छाल (Palash Mucchal) याच्याशी विवाहबद्ध होणार आहे. स्मृतीच्या मूळ गावी सांगलीमध्ये विवाहसोहळा होणार आहे. काल लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री संगीतचा कार्यक्रम पार पडला. यावेळी टीम इंडियातील जेमिमा रॉड्रीग्ज, श्रेयंका पाटील यांसह इतर मुलींनी भन्नाट डान्स केला. तो व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
स्मृती आणि पलाश यांच्या संगीत कार्यक्रमासाठी अनेक बडे लोक आले होते. त्यातच स्मृतीच्या टीम इंडियातील काही सहकारीही आल्या होत्या. श्रेयंका पाटील, राधा यादव, जेमिमा रॉड्रीग्ज यांसह टीम इंडियातील काही महिला खेळाडूंनी धडाकेबाज डान्स केला. बॉलिवूडमधील तुझे लागे ना नजरिया या गाण्यावर या मुलींनी डान्स केला. बिजुरीया शब्दांवर त्यांनी केलेली हूकस्टेप्स पाहून तर साऱ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, याच संगीत सोहळ्यात स्मृती आणि पलाश यांनीही डान्स केला. स्मृती-पलाशच्या घरची मंडळी, मित्रपरिवार यांच्यासह अनेकांनी स्टेजवर डान्स करत कार्यक्रमाला बहर आणला. पण यात सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो म्हणजे वधू-वरांचा डान्स. स्मृती आणि पलाश यांनी सलाम-ए-इश्क या बॉलिवूड चित्रपटातील तैनु लेके मै जावांगा या गाण्यावर भन्नाट डान्स केला. यात महिला क्रिकेटर जेमिमा स्मृतीला स्टेजवर घेऊन आली आणि त्यानंतर पलाश स्मृती यांनी डान्स केला. डान्सच्या शेवटी पलाश-स्मृतीने अतिशय रोमँटिक पद्धतीने पोज देत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.