राहुल द्रविड ऑस्ट्रेलियाच्या 'आयडिया' वापरून भारतातील युवा खेळाडूंना घडवतोय; ग्रेग चॅपल यांचा दावा

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियन मानसिकतेचा अभ्यास करून देशांतर्गत संरचना तयार केली जी की देशातील राष्ट्रीय संघाला ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 10:14 AM2021-05-13T10:14:41+5:302021-05-13T10:20:33+5:30

whatsapp join usJoin us
Rahul Dravid has picked 'Australian brains' and replicated it in India to nurture young players: Greg Chappell | राहुल द्रविड ऑस्ट्रेलियाच्या 'आयडिया' वापरून भारतातील युवा खेळाडूंना घडवतोय; ग्रेग चॅपल यांचा दावा

राहुल द्रविड ऑस्ट्रेलियाच्या 'आयडिया' वापरून भारतातील युवा खेळाडूंना घडवतोय; ग्रेग चॅपल यांचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियन मानसिकतेचा अभ्यास करून देशांतर्गत संरचना तयार केली जी की देशातील राष्ट्रीय संघाला सातत्याने खेळाडू देत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला याचीच उणीव भासत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांनी व्यक्त केले. युवा खेळाडूंना ओळखण्यात भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे, असेही चॅपल म्हणाले. ज्या पक्षासाठी भांडताय, तो मेलेल्या व्यक्तिला परत आणू शकत नाही; इरफान पठाण भडकला, कंगनाच्या नावाचाही उल्लेख केला 

चॅपेल यांनी ‘क्रिकेट.कॉम.एयू’शी बोलताना म्हटले, ‘‘आम्ही काय करीत आहोत हे राहुल द्रविड आमच्याकडून शिकला आणि भारतात याची पुनरावृत्ती केली. भारताजवळ  जास्त पर्याय होते. त्यामुळे भारताने यश प्राप्त केले.’’
 या वर्षाच्या सुरुवातीला अनेक महत्त्वाचे खेळाडू जखमी झाल्यामुळे भारताच्या दुय्यम संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर  धूळ चारत बॉर्डर गावसकर करंडक जिंकला होता. कर्णधार विराट कोहलीदेखील वैयक्तिक कारणामुळे चार सामन्यांच्या मालिकेतील फक्त एकच सामना खेळू शकला होता. चॅपल यांच्यानुसार भारताजवळ प्रभावी खेळाडूंची विकास प्रणाली आहे आणि त्यांच्या युवा खेळाडूंजवळदेखील आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. 'विराट' लक्ष्य पार; कोरोना लढ्यासाठी जमा झाले जवळपास ११ कोटी; विराट-अनुष्काच्या मोहिमेचे अजून दोन दिवस बाकी

भारताचे माजी प्रशिक्षक चॅपल म्हणाले, ‘‘जर तुम्ही ब्रिस्बेन कसोटी खेळणारा भारतीय संघ पाहिला तर यात तीन ते चार नवीन खेळाडू होते. हे खेळाडू भारत अ संघासाठी खूप सामने खेळलेले होते आणि ते ही फक्त भारतातच नव्हे तर विविध परिस्थितीत खेळले होते. त्यामुळे जेव्हा ते निवडले गेले ते नवखे खेळाडू नव्हते, ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होते.’’ होय हे खरं आहे; स्कॉटलंड संघाकडून राहुल द्रविड खेळलाय 11 वन डे, पाच प्रसंग जे तुम्हाला माहितही नसतील!

‘पूर्वी आम्ही खेळाडूंना तयार करण्यात सर्वोत्तमपैकी एक होतो आणि त्यांना व्यवस्थेशी जोडून ठेवत होतो; परंतु गेल्या काही वर्षांत यात बदल झाला, असे मला वाटते. मी गुणवत्ता असणारा  युवा खेळाडूंचा समूह पाहिला आहे. मात्र, त्यांना पुरेशी संधी मिळत नाही.  आम्ही गुणवत्ता शोधण्यात आपले सर्वोत्तम स्थान गमावले, असे मला वाटते. भारत आमच्यापेक्षा जास्त चांगले कार्य करीत आहे.’’ मोठी बातमी : टीम इंडियाविरुद्धच्या WTC Finalनंतर निवृत्ती घेण्याची न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची घोषणा!

Web Title: Rahul Dravid has picked 'Australian brains' and replicated it in India to nurture young players: Greg Chappell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.