मोठी बातमी : टीम इंडियाविरुद्धच्या WTC Finalनंतर निवृत्ती घेण्याची न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची घोषणा!

न्यूझीलंडचा संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) फायनलसाठी तयारी करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:03 PM2021-05-12T15:03:43+5:302021-05-12T15:04:59+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand's most successful test wicketkeeper BJ Watling to hang up gloves after England tour | मोठी बातमी : टीम इंडियाविरुद्धच्या WTC Finalनंतर निवृत्ती घेण्याची न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची घोषणा!

मोठी बातमी : टीम इंडियाविरुद्धच्या WTC Finalनंतर निवृत्ती घेण्याची न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची घोषणा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंडचा संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) फायनलसाठी तयारी करत आहे. जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यासाठी किवी खेळाडू लवकरच लंडनमध्ये दाखल होतील. केन विलियम्सन, कायले जेमिन्सन, मिचेल सँटनर व फिजिओ टॉमी सिम्सेक हे मालदीवहून लंडनसाठी रवाना होणार आहे. या दौऱ्याची तयारी करत असताना किवी संघातील कसोटीतील सर्वात यशस्वी यष्टिरक्षक बी जे वॉटलिंग ( BJ Watling) यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची माहिती, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं दिली. RP Singh's Father Passed Away : भारताचा माजी क्रिकेटपटू आर पी सिंग याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन 

35 वर्षीय वॉटलिंग हा 2009 पासून किवी संघाचा सदस्य आहे आणि त्यानं किवींकडून सर्वाधिक 249 झेल ( क्षेत्ररक्षक म्हणून 10 झेल) आणि 8 स्पम्पिंग नावावर आहेत.  वॉटलिंग यानं 28 वन डे व 5 ट्वेंटी-20 सामन्यातही न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. ''न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे, ही खूप मोठी सन्मानाची बाब आहे. विशेष करून कसोटी संघाची जर्सी परिधान करणे,''असे वॉटलिंग यानं सांगितले. तो म्हणाला,''मी अनेक दिग्गज खेळाडूंसोबत खेळलो आणि अनेक चांगले मित्र मिळवले. इंग्लंड दौऱ्यानंतर मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करतो. या तीन कसोटीत सर्वोत्तम देण्याचा माझा प्रयत्न असेल.'' वेस्ट इंडिजचा रोविंद्र रामनरीन कसा बनला भारताचा रॉबिन सिंग?; टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला परदेशी खेळाडू

वॉटलिंगनं 73 कसोटीत 38.11च्या सरासरीनं 3773 धावा केल्या आणि त्यात 8 शतकं व 19 अर्धशतकांचा समावेश आहे. 2019मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यानं 205 धावांची सर्वोत्तम वैयक्तिक केळी केली होती. न्यूझीलंडकडून द्विशतक झळकावणारा तो पहिलाच यष्टिरक्षक-फलंदाज ठरला.   

Web Title: New Zealand's most successful test wicketkeeper BJ Watling to hang up gloves after England tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.