Join us

WTC फायनलमध्ये नियम बदलले; टीम इंडियाला फायदा होणार की तोटा? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 09:33 IST

Open in App
1 / 8

टेस्ट क्रिकेटची वर्ल्डकप फायनल उद्यापासून खेळविली जाणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये टक्कर होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर सात जूनपासून सहा दिवस हा सामना खेळविला जाईल. भारताचे पारडे जड आहे, कारण काही महिन्यांपूर्वी झालेल्या टेस्ट सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केले होते. परंतू, यावेळी थोडा गेम वेगळा असणार आहे. नवे नियम लागू होणार आहेत.

2 / 8

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळत आहे. २०२१ मध्ये पहिल्या टुर्नामेंटमध्ये साऊथम्पटनमध्ये फायनल खेळली होती. न्यूझीलंडने भारताचा आठ गड्यांनी पराभव केला होता. आता ऑस्ट्रेलियाला हरवून भारताकडे वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे.

3 / 8

या फायनलमध्ये दोन्ही देशांमध्ये जबरदस्त क्रेझ दिसत आहे. निकाल लागणारा सामना व्हावा यासाठी पाच दिवसांचा असलेला सामना सहा दिवसांचा होणार आहे. याचबरोबर आयसीसीने प्लेईंग कंडीशनमध्ये काही बदल केले आहेत. यामुळे लढत रोमांचक होईलच त्याचबरोबर पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न झाला आहे. काय काय बदल झाले पाहुयात...

4 / 8

अंतिम सामन्यात 'सॉफ्ट सिग्नल' नियम वापरला जाणार नाही. म्हणजेच मैदानावरील पंचांना निर्णयाचा संदर्भ देण्यापूर्वी 'सॉफ्ट सिग्नल' देण्याचा अधिकार राहणार नाही. यापूर्वी, मैदानावरील पंचांनी संशयास्पद झेल प्रकरणी तिसऱ्या पंचाची मदत घेतल्यास त्याला 'सॉफ्ट सिग्नल' द्यावा लागत होता. हा नियम 1 जूनपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.

5 / 8

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्‍या WTC फायनलमध्ये, जर ढगाळ वातावरण असेल आणि नैसर्गिक प्रकाश तितकासा चांगला नसेल, तर फ्लडलाइट्स चालू करण्यात येणार आहेत. या सामन्यासाठी १२ जून रोजी राखीव दिवस (सहावा दिवस) ठेवण्यात आला आहे.

6 / 8

आयसीसीने 1 जूनपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान धोकादायक परिस्थितीत हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. आता वेगवान गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजाला हेल्मेट घालावे लागणार आहे. यष्टीरक्षकालाही स्टंपजवळ असताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.

7 / 8

एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील फ्री हिट्सच्या नियमांमध्येही आयसीसीने बदल केला आहे. फ्री हिटच्या वेळी जर चेंडू स्टंपला लागला आणि बॅट्समनने त्यावर धावून धाव घेतली तर ती मोजली जाणार आहे.

8 / 8

ऑस्ट्रेलिया नेहमी रडीचा डाव खेळतो. सॉफ्ट सिग्नलपासून अंपायर्सना परावृत्त केल्याने थर्ड अंपायरला निर्णय घेणे सोपे जाणार आहे. सॉफ्ट सिग्नलवरून अनेकदा गदारोळ झाला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान, मार्नस लॅबुशेनला मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिग्नल म्हणून झेलबाद दिले. हा झेल स्पष्ट नव्हता. परंतू मैदानावरील पंचांचा निर्णय रद्द करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे पुरेसे पुरावे नव्हते. यामुळे त्यांना पंचांचा निर्णय़ कायम ठेवावा लागला.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App