स्मृतीचा RCB संघ टॉपला; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील MI तळागाळात

मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत

महिला प्रीमिअर लीग २०२५ च्या तिसऱ्या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील गत चॅम्पियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ जोमात तर दोन संघ कोमात असा सीन पाहायला मिळतोय.

इथं एक नजर टाकुयात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लढतीनंतर गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानावर आहे, त्यासंदर्भातील माहिती

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत या स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केलीये. ४ गुण खात्यात जमा करून +१.४४० अशा उत्तम नेट रनरेटसह आरसीबी टॉपला आहे.

आरसीबी पाठोपाठ गुणतालिकेत गुजरात जाएंट्स संघाचा नंबर लागतो. अ‍ॅश्ली गार्डनरच्या नेतृत्वाखालील गुजरातच्या संघानं २ सामन्यांपैकी १ विजय आणि १ पराभव अशा कामगिरीसह २ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. या संघाचे नेट रनरेटही +०.११८ असं आहे.

मेग लेनिंगच्या कॅप्टन्सीत दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्याती एका विजयासह २ गुण मिळवत आपलं खातं उघडलं आहे. यूपी वॉरियर्सला पराभूत करून त्यांनी गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवलं आहे. पण या संघाचे नेट रनरेट -०.८८२ असे मायनसमध्ये दिसते.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघानं स्पर्धेत एक सामना खेळला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून हा संघ अजूनही खाते उघडण्याच्या प्रतिक्षेत आहे.

यूपी वॉरियर्स संघालाही अद्याप विजय गवसलेला नाही. परिणामी हा संघ सर्वात तळाला असल्याचे दिसून येते.

मंगळवारी १८ फेब्रुवारीला मुंबई इंडियन्सचा संघ गुजरातविरुद्ध भिडणार आहे. हा सामना जिंकून ते खाते उघडत गुणतालिकेत आगेकूच करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

दुसरीकडे गुजरातचा संघ हा सामना जिंकून आपलं गुणतालिकेतील स्थान अधिक भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.