Join us  

WPL 2024: MI vs RCB कोण मिळवणार फायनलचे तिकीट? आज थरार, जाणून घ्या सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:40 PM

Open in App
1 / 7

महिला प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामाचा चॅम्पियन कोण हे ठरवण्यासाठी अवघे दोन सामने शिल्लक आहेत. आज शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्समध्ये सामना होत आहे.

2 / 7

आजच्या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. मुंबई इंडियन्सच्या संघाने पदार्पणाच्या हंगामात जेतेपद पटकावले होते. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत आपले वर्चस्व राखत थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

3 / 7

आरसीबी आणि मुंबई यांच्यातील विजयी संघ १७ तारखेला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध किताबासाठी मैदानात असेल. महिला प्रीमिअर लीगचा यंदाचा हंगाम बंगळुरू आणि दिल्लीत पार पडत आहे.

4 / 7

मागील वर्षी प्लेऑफचे तिकीट मिळवण्यात अपयशी ठरलेल्या आरसीबीने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात मुंबईला नमवून आपले स्थान मजबूत केले. त्यामुळे आज स्मृती मानधना विरूद्ध हरमनप्रीत कौर अशी लढाई आहे.

5 / 7

आजचा एलिमिनेटरचा सामना आणि अंतिम सामना नवी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सामना सुरू होईल.

6 / 7

स्पोर्ट्स १८ आणि जिओ सिनेमावर दोन्हीही लढतींचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. आजचा सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे आव्हान मुंबई इंडियन्ससमोर असेल. तर मुंबईला नमवून दिल्लीला भिडण्यासाठी आरसीबीचा संघ प्रयत्नशील असेल.

7 / 7

दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. मागील हंगामात मुंबईने दिल्लीला नमवून पदार्पणाच्या हंगामात ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली. कागदावर आरसीबी आणि मुंबई हे दोन्हीही संघ तगडे असले तरी कोणाचे पारडे जड असेल हे पुढच्या काही तासातच समजेल. आरसीबी आणि मुंबई या दोन्ही संघांचा साखळी फेरीतील अखेरचा एकमेकांविरोधात झाला होता. तेव्हा आरसीबीच्या एलिसे पेरीने अष्टपैलू खेळी केली. तिने ६ बळींसह फलंदाजीतही चमक दाखवली अन् आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगहरनमप्रीत कौरस्मृती मानधनामुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर