Join us

शुबमन गिलला फुलं देऊन रोमँटिक पोझ देणारी ती मुलगी नक्की आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 22:12 IST

Open in App
1 / 9

Mystery Girl with Shubman Gill: टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल सध्या तुफान फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या IPL मध्ये त्याला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला, पण सध्या तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. (Niharika NM)

2 / 9

टीम इंडियाचा ओपनर शुबमन गिल फलंदाजी सोबतच अफेयरच्या चर्चांसाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच त्याचे एका तरूणीसोबतचे फोटो व्हायरल झालेत, ज्यात ती त्याला फुलं देऊन रोमँटिक पोझ देतेय.

3 / 9

फोटो व्हायरल होताच, ही तरूणी नक्की कोण असा प्रश्न साऱ्यांनाच पडलाय. जाणून घेऊया तिच्याबद्दल...

4 / 9

शुबमनसोबत सध्या व्हायरल झालेल्या फोटोतील मुलगी आहे सोशल मीडिया इन्फ्लुएंअर निहारिका एनएम. ती तिच्या याच हटके नावाने ओळखली जाते.

5 / 9

निहारिका एनएम लॉस एंजिल्समधील एक भारतीय कंटेंट क्रिएटर आहे. ती अतिशय विनोदी पद्धतीने विविध विषयांवरील मत YouTube व्हिडिओ आणि इंस्टाग्राम रील्सवर मांडते. YouTube ती तिच्या विनोदी बंगलोरी उच्चारांसाठी प्रसिद्ध आहे.

6 / 9

ICSE बोर्ड परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारी ती आयआयटीमध्ये दाखल झाली होती. पण त्यात रस नसल्यामुळे तिने ते शिक्षण सोडले.

7 / 9

अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी असताना 2016 मध्ये तिने तिचे YouTube चॅनल सुरू केले. लॉकडाऊन काळात तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने अनेक प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती घेतल्या.

8 / 9

इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले तेव्हाच तिचे 100k फॉलोअर्स होते. तिचे खाते सुरू केल्यानंतर दोन महिन्यांत तिने 1 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. Instagram वर सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल कंटेंट क्रिएटरपैकी ती एक आहे.

9 / 9

निहारिका एक टॉक शो होस्ट करते. त्यात ती अनेक सेलिब्रिटींना बोलवत असते. त्यासोबतच शो मध्ये ती विविध सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारते. शुबमनसोबत व्हायरल झालेले फोटो याच मुलाखतीचे होतो. त्या मुलाखतीचा शॉर्ट व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.

टॅग्स :शुभमन गिलसेलिब्रिटीबॉलिवूडयु ट्यूबइन्स्टाग्राम
Open in App