वर्ल्ड कपमध्ये वेगाचे बादशाह ठरले १० गोलंदाज; स्पीड पाहून फलंदाज गपगार, पाहा यादी...!

The fastest bowlers at T20 World Cup 2022: २०२२च्या या वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला, याची यादी आता आयसीसीने जाहीर केली आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला. पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून विजय मिळवताना इंग्लंडने २०१०नंतर पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला. वेस्ट इंडिजनंतर दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा तो दुसरा संघ ठरला, परंतु एकाच वेळी वन डे व ट्वेंटी-२० असे वर्ल्ड कप नावावर असलेला जगातील पहिलाच संघ ठरला. २०२२च्या या वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला, याची यादी आता आयसीसीने जाहीर केली आहे. पाहा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२मधील टॉप १० वेगवान गोलंदाज....

पॅट कमिन्स- 147.37kph

अल्जारी जोसेफ- 147.82kph

लहिरु कुमारा- 148.24kph

क्रिस जॉर्डन- 148.74kph

तस्कीन अहमद- 149.56kph

मिचेल स्टार्क- 149.95kph

हारिस रौफ- 150.75kph

एनरिच नॉर्खिया- 154.31kph

ल्युकी फर्ग्युसन- 154.55kph

मार्क वूड- 154.74kph