हरवलेला सूर शोधण्यासाठी नव्या दमाने उतरलेल्या टीम इंडियाने इंग्लंडविरूद्ध टी२० मालिकेची सुरुवात विजयाने केली.
इंग्लंड विरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना ७ गडी राखून सहज जिंकला.
भारताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने ३ बळी घेतले तर फलंदाजीत अभिषेक शर्माने ७९ धावा करत विजय मिळवला.
अभिषेकने ३४ चेंडूत तुफानी ७९ धावांची खेळी केली. तरीही दुसऱ्या सामन्यातून त्याला वगळण्याची शक्यता आहे.
फिल्डिंगचा सराव करताना अभिषेकला दुखापत झाली. त्यामुळे त्याजागी वॉशिंग्टन सुंदर किंवा ध्रुव जुरेलला संधी मिळू शकते.
मोहम्मद शमीलादेखील संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी नितीश रेड्डीला संघाबाहेर बसावे लागू शकते.