Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना सूर्या-इशान जोडीच ठरलीये सगळ्यात भारी, इथं पाहा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 23:58 IST

Open in App
1 / 10

रायपूरच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या धमाकेदार खेळीसह शिवम दुबेनं दिलेल्या योगदानाच्या जोरावर टीम इंडियाने विक्रमी विजय नोंदवला.

2 / 10

न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने २८ चेंडू शिल्लक असताना सामना खिशात घातला.

3 / 10

२०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना सर्वात जलदगतीने धावांचा यशस्वी पाठलाग करताना पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

4 / 10

इथं एक नजर टाकुयात भारतीय क्रिकेट संघाने टी-२० मध्ये धावांचा पाठलाग करत मिळवलेल्या मोठ्या विजयाच्या रेकॉर्डवर...

5 / 10

२०२३ मध्ये भारतीय संघाने विशाखापट्टणमच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

6 / 10

कमालीचा योगायोग म्हणजे या सामन्यात सूर्यकुमार यादवनं ४२ चेंडूत ८० धावा तर इशान किशन याने ५८ धावांची खेळी केली होती.

7 / 10

२०१९ मध्ये भारतीय संघाने हैदराबादच्या मैदानात वेस्टइंडीजविरुद्ध २०८ धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला होता. या सामन्यात विराट कोहलीनं ५० चेंडूत ९४ धावांची जबरदस्त खेळी केली होती.

8 / 10

२००९ मध्ये श्रीलंकेच्या संघाने मोहालीच्या मैदानात भारतीय संघासमोर २०७ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना विरेंद्र सेहवागची ६४ धावांची स्फोटक खेळी पाहायला मिळाली होती.

9 / 10

युवराज सिंगने २५ चेंडूत ६० धावांच्या नाबाद खेळीसह मोहालीच्या मैदानातील टीम इंडियाचा विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

10 / 10

२०२० मध्ये आकलंडच्या ईडन पार्कवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने ६ विकेट्स राखून २०४ धावांचा यशस्वी पाठलाग केल्याचा रेकॉर्ड आहे. या सामन्यात केएल राहुलनं २७ चेंडूत ५६ धावा तर श्रेयस अय्यरनं २९ चेंडूत नाबाद ५८ धावांची दमदार खेळी केली होती.

टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादवइशान किशनविराट कोहलीलोकेश राहुलश्रेयस अय्यर