Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:39 IST

Open in App
1 / 6

कोलकाता येथे झालेला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना अवघ्या ३ दिवसांतच संपला. दक्षिण आफ्रिकेने भारताला ३० धावांनी पराभूत केले. त्यानंतर खेळपट्टीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.

2 / 6

भारताच्या मानहानीकारक पराभवात खेळपट्टीने मोठी भूमिका बजावली असे जाणकारांचे मत आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवून भारत स्वतःच्याच जाळ्यात अडकला. त्यामुळेच भारतीय संघ व्यवस्थापनावरही टीका होते आहे.

3 / 6

प्रशिक्षक गौतम गंभीरचा असा विश्वास आहे की खेळपट्टीमध्ये कोणताही दोष नव्हता. पण खेळपट्टीच्या वादात आता माजी भारतीय कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुलीने एक मोठा खुलासा केला आहे.

4 / 6

'खेळपट्टीचा पॅटर्न ठरवण्यापूर्वी माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नव्हती. पिच निवडीत मी अजिबात सहभागी नव्हतो. बीसीसीआयचे क्युरेटर कसोटी सामन्याच्या चार दिवस आधी आले आणि त्यांनी खेळपट्ट्यांची जबाबदारी घेतली.'

5 / 6

'आमच्याकडे आमचे स्वतःचे क्युरेटर (सुजन मुखर्जी) देखील आहेत. त्यांनी दीर्घकाळ उत्तम काम केले आहे. ज्याप्रकारे विनंती केली जाते तशाप्रकारचे पिच ते बनवून देतात. आम्ही कुठल्याही प्रकारे स्वत: यात सहभागी होत नाही.'

6 / 6

'बीसीसीआयच्या क्युरेटरने बनवलेले पिच फारसे चांगले नव्हते. भारतीय संघाचे सलामीवीर आणि मधल्या फळीची फलंदाजी चांगल्या पिचवर खेळण्यास पात्र आहे,' अशा शब्दांत गांगुलीने रोखठोक मत मांडले.

टॅग्स :सौरभ गांगुलीदक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघ