पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story

Smriti Mandhana love story with Palash Muchhal: पलाश आणि स्मृती यांचा २३ नोव्हेंबरला सांगलीत लग्नसोहळा

महिला क्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छाल रविवारी (२३ नोव्हेंबर) लग्नबंधनात अडकणार आहेत.

नुकतेच स्मृती आणि पलाश यांचा साखरपुडा झाला. आता रविवारी सांगलीत शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहचलेले हे नाते सुरू कुठून झाले, त्यांची लव्ह स्टोरी कशी फुलली हे तुम्हाला माहितीये का?

स्मृती आणि पलाश एकमेकांना कधीपासून ओळखतात याची माहिती नसली तरीही त्यांचे नाते २०१९ पासून बहरले.

२०१९ पासून स्मृती आणि पलाश या दोघांची एकमेकांशी मैत्री आणि जवळीक वाढली. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले.

पलाश-स्मृतीने आपले नाते फार लवकर सार्वजनिक केले नाही. त्यांच्याबद्दल काही वेळा चर्चा रंगल्या पण ते गप्प राहिले.

जुलै २०२४ मध्ये मात्र नात्याला पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी एक गोड सोशल मीडिया पोस्ट केली आणि माहिती दिली.

पलाशने अनेकदा सार्वजनिक जीवनात स्मृतीचे तोंडभरून कौतुक केले आहे, तिला मेहनती आणि प्रेरणादायी स्त्री म्हटले आहे.

नुकताच, भारताच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर पलाशने स्मृतीसोबत ट्रॉफीसह फोटोही शेअर केला होता.

त्यानंतर स्मृतीने ज्या मैदानावर वर्ल्डकप जिंकला, तिथेच पलाशने तिला प्रपोज केले आणि स्मरणात राहिल अशी आठवण दिली.

स्मृती मंधाना २३ नोव्हेंबरला सांगलीमध्ये विवाहबद्ध होणार असून, ती आता ‘इंदूरची सून’ होणार आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्राम)