Join us
Daily Top 2Weekly Top 5

WPL Auction 2023: WPL लिलावात भारतीय महिला मालामाल; जाणून घ्या खेळाडूंच्या प्रतिक्रिया एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 19:24 IST

Open in App
1 / 10

महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. या लिलावात एकूण 5 फ्रँचायझी रिंगणात आहेत. BCCI ने WPL 2023च्या लिलावासाठी 409 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यासाठी एकूण 1525 खेळाडूंनी नोंदणी केली होती.

2 / 10

महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 4 ते 26 मार्च दरम्यान पार पडणार आहे. स्मृती मानधनाला आरसीबीच्या फ्रँचायझीने विक्रमी बोली लावून खरेदी केले. तर भारताच्या विश्वविजेत्या संघाची कर्णधार शेफाली वर्मा हिला दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने खरेदी केले आहे. याशिवाय भारताच्या वरिष्ठ संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 1.10 कोटी रूपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले.

3 / 10

मराठमोळी क्रिकेटपटू स्मृती मानधनाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने 3.40 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले. आरसीबीच्या फ्रँचायझीने खरेदी केल्यानंतर स्मृतीने म्हटले, 'आरसीबीच्या संघाकडून खेळण्यासाठी खूप उत्सुक असून आरसीबीकडे एक मोठा वारसा आहे. आरसीबीचा भाग होण्यासाठी खरोखरच उत्सुक आहे.'

4 / 10

तर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 1.80 कोटीत आपल्या संघात घेतले.

5 / 10

मुंबई इंडियन्सच्या फ्रॅंचायझीने 1.80 कोटी रूपयांमध्ये खरेदी केल्यानंतर हरमनप्रीत कौरने म्हटले, 'मुंबई इंडियन्सचा पुरूष संघ शानदार कामगिरी आहे. आम्ही देखील तेच करण्याचा प्रयत्न करू. आताच्या घडीला खूप दबाव आहे, पण मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी आतुर देखील आहे. महिला क्रिकेट केवळ भारतातच नाहीतर जगभरात बदलत आहे. मला आशा आहे की मुंबईचे चाहते आम्हाला खूप पाठिंबा देतील.'

6 / 10

भारताच्या अंडर-19 विश्वविजेत्या महिला संघाची कर्णधार शेफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले. शेफाली वर्माने 'दिलवाले दिल्लीवाले' अशा आशयाचे ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

7 / 10

विश्वचषकात काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानची जिरवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने खरेदी केले. 2.20 कोटींच्या मोठ्या रकमेमध्ये खरेदी केल्यानंतर जेमिमाने 'दिल से दिल्ली' असे ट्विट केले. तसेच आगामी हंगाम आम्ही जिंकू असा विश्वास देखील तिने व्यक्त केला.

8 / 10

भारतीय संघाची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग हिला आरसीबीच्या फ्रँचायझीने 1.5 कोटीमध्ये खरेदी केले. 'आरसीबीने मला खरेदी केल्याने मी खूप आनंदी आहे. मी त्यांच्यात सामील होण्यासाठी आणि स्मृती मानधनासोबत खेळण्यासाठी अधिक प्रतिक्षा करू शकत नाही', अशी प्रतिक्रिया यावेळी रेणुका सिंगने दिली.

9 / 10

भारतीय संघाची स्फोटक फलंदाज रिचा घोषला आरसीबीच्या फ्रँचायझीने 1.90 कोटीमध्ये केले आहे. आरसीबीने खरेदी केल्यानंतर रिचाने एक भावनिक प्रतिक्रिया देत म्हटले, 'मला माझ्या पालकांसाठी कोलकाता येथे घर घ्यायचे आहे, त्यांनी खूप संघर्ष केला आहे.'

10 / 10

अष्टपैलू हरलीन देओल हिला गुजरात जायंट्सच्या फ्रँचायझीने 40 लाख रूपयांमध्ये खरेदी केले. 'केम छो गुजरात', अशा आशयाचे ट्विट करून हरलनीनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगस्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघटी-20 क्रिकेटमहिला
Open in App